सावंतवाडीत भाजप-शिंदे सेनेचे शक्तिप्रदर्शन

सावंतवाडीत भाजप-शिंदे सेनेचे शक्तिप्रदर्शन

Published on

04797
सावंतवाडी ः तहसील कार्यालयात शिंदे शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करताना अॅड. नीता सावंत-कविटकर. बाजूला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, संजू परब, भारती मोरे, बाबू कुडतरकर.
04798
सावंतवाडी ः भाजपतर्फे नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करताना युवराज्ञी श्रद्धा सावंत-भोसले. बाजूला विशाल परब, वेदिका परब, अॅड. अनिल निरवडेकर, सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक. (छायाचित्रे ः रुपेश हिराप)


सावंतवाडीत भाजप-शिंदे सेनेचे शक्तिप्रदर्शन

उमेदवारी अर्ज दाखल; रंगत वाढण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेसह भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपकडून युवराज्ञी श्रद्धा सावंत भोसले या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याचे युवा नेते विशाल परब यांनी यावेळी जाहीर केले.
दुसरीकडे भाजपकडूनच इच्छुक असलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांनीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या (ता.१७) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून भाजप, ठाकरे शिवसेना हे उर्वरित जागांसाठी तर काँग्रेस पक्षाकडून नगराध्य पदासह नगरसेवकांच्या जागावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
येथील पालिकेच्या निवडणुकीला आता हळूहळू रंगत येऊ लागली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असताना आज भाजप आणि शिंदे शिवसेनेतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी श्री देव पाटेकर, श्री देव उपरलकर यांचे आशीर्वाद घेऊन शहरातून रॅलीद्वारे पालिकेमध्ये उमेदवारांसह दाखल होत उमेदवारी अर्ज भरले. दुसरीकडे भाजपकडून युवा नेते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
दोन्ही पक्षांचा विचार करता एक प्रकारे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आणि उमेदवारांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद दिसून येत होता. पालिकेच्या परिसरात उमेदवारासह त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मोठी गर्दी पाहायला मिळत होती. शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी ॲड. निता सावंत कविटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर डमी म्हणून भारती मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. नगरसेवक पदासाठी दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, दुर्गेश सुर्याजी, संजना पेडणेकर, आरती सावंत, वैभव खम्हापसेकर, गोविंद वाडकर, नासिर पटेल, सायली दुभाषी, प्रसाद नाईक, उत्कर्षा सासोलकर, राहूल नाईक, गुरुप्रसाद मिशाळ, परिक्षीत मांजरेकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष संजू परब, बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दुसरीकडे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी युवराज्ञी श्रद्धा सावंत भोसले यांनी उमेदवारी दाखल केली तर नगरसेवक पदासाठी दिपाली भालेकर, सुधिर आडिवरेकर, राजू बेग, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर, उदय नाईक, मेघना राऊळ, मोहिनी मडगावकर, दुराली रांगणेकर, समृद्धी विर्नोडकर, प्रतिक बांदेकर, प्रेमानंद ऊर्फ बबन साळगावकर, सुकन्या टोपले, अनिल निरवडेकर, वेदिका सावंत यांनी अर्ज दाखल केले.

भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या अन्नपूर्णा कोरेगावकर यांनी स्वतंत्र कुटुंबासमवेत येत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. त्यांनी अपक्ष आणि भाजप असे दोन अर्ज भरले. त्यांच्यासोबत वडील श्रीरंग आचार्य, माजी नगरसेवक ॲड. पुष्पलता कोरगावकर, व्यंकटेश शेट, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर उपस्थित होते. ठाकरे शिवसेकडून शहर संघटक निशांत तोरसकर व शिप्रा सावंत यांनी उमेदवारी दाखल केली. उद्या (ता.१७) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या साक्षी वंजारी यांच्यासह नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या काही जणांकडून अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. भाजपचे काहीजण उद्या अर्ज दाखल करणार आहेत. एकूणच उमेदवारी अर्ज भरताना आज झालेल्या गर्दीमुळे पालिकेच्या निवडणुकीमध्ये एकप्रकारे रंगत वाढू लागली असल्याचे दिसून आले.
-----------------
कोरगावकरांची भूमिका महत्वाची
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून इच्छुक असलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून मला एबी फॉर्म मिळवा असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, युवा नेते विशाल परब यांनी युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले या भाजपच्या उमेदवार असल्याचे आज जाहीर केल्याने कोरगावकर यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्या उमेदवारी अर्ज मागे घेतात की रिंगणात राहतात? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
----------------
नविन चेहऱ्यांना संधी?
पालिकेच्या या निवडणुकीमध्ये उतरलेल्या भाजप, ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेनेकडून यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. बऱ्याच जुन्या चेहऱ्यांचे पत्ते यावेळी कट झाले आहेत तर काही इच्छुकांची संधीही हुकली आहे. यावेळी सुशिक्षित आणि तरुण चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र, इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने आणि जुन्या चेहऱ्यांना संधी न मिळाल्याने सर्वच पक्षांना नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com