नेरुर येथे रविवारी तिरंगी भजन सामना

नेरुर येथे रविवारी तिरंगी भजन सामना

Published on

नेरुर येथे रविवारी
तिरंगी भजन सामना
कुडाळः तालुक्यातील नेरुर येथील श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ, तसेच रणझुंजार मित्रमंडळ व उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा सामना रविवारी (ता. २३) रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, भरणी कुडाळचे बुवा विनोद चव्हाण (कै. चिंतामणी पांचाळ यांचे शिष्य), श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्देचे बुवा विजय ऊर्फ गुंडू सावंत (अशोक सावंत यांचे शिष्य) व वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळचे बुवा संदीप लोके (गुरुवर्य विजय परब यांचे शिष्य) यांच्यात हा तिरंगी भजनांचा सामना होणार आहे. रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ, रणझुंजार मित्रमंडळ व उद्योजक पावसकर यांनी केले आहे.
......................
आरवलीत गुरुवारी
जागबाई जत्रोत्सव
आरोंदाः आरवली येथील जागृत देवस्थान देवी जागबाई पंचायतन देवस्थान मंदिरात आजपासून जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. यानिमित्त बुधवारपर्यंत (ता. १९) देवी जागबाईकडे महारुद्र व नवचंडी, गुरुवारी (२०) देवी जागबाई जत्रा, केळी ठेवणे, ओटी भरणे, पालखी, आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक तसेच २२ व २३ ला देव रवळनाथ मंदिर येथे अवसारी कौल, २४ ला कवळासाने उत्सवाची सांगता होणार आहे.
............................
साहित्य संमेलनानिमित्त
विविध स्पर्धांचे आयोजन
सावंतवाडीः सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय आयोजक समितीने श्रीराम वाचन मंदिरात झालेल्या बैठकीत घेतला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर व श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. हे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन २८ डिसेंबरला राणी पार्वतीदेवी हायस्कूल सभागृहात होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री नीरजा असून उद्‌घाटक ज्येष्ठ लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे आहेत. शिक्षकांसाठी पुस्तक रसग्रहण स्पर्धा ७ डिसेंबरला, जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धा १४ ला होणार आहे. आठवी ते बारावीसाठी निबंध स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक भेट दिले जाईल. संमेलन बोधचिन्ह स्पर्धेचेही आयोजन केले आहे. संमेलनात मुख्य मुलाखत घेण्याच्या दृष्टीने डॉ. भालचंद्र मुणगेकर, संध्या नरे-पवार यांच्या नावाची चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम यांच्यासह मधुकर मातोंडकर, राजेश मोंडकर, श्वेतल परब, मंजिरी मुंडले, विजय ठाकर, मनोहर परब, काका पटेल, महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com