राज्य निबंध स्पर्धेत शशिकांत तांबे प्रथम
swt174.jpg
04877
शशिकांत तांबे
राज्य निबंध स्पर्धेत
शशिकांत तांबे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ : डॉ. विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून मुंबई शहर शिक्षक विकास मंडळातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक, शिक्षक शशिकांत तांबे यांच्या ‘शिक्षक म्हणून माझा प्रवास’ या निबंधाची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
राज्यभरातून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक हजार निबंधांमधून ५० निबंधांची निवड करण्यात आली. अंतिम निवडीमध्ये तांबे यांच्या निबंधाची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण २२ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आमदार प्रवीण दरेकर, सुप्रसिद्ध अभिनेते, ‘पद्मश्री’ अशोक सराफ, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, सुप्रसिद्ध संगीतकार अन्नू मलिक, अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ, अभिनेते अभिनय बेर्डे, किशोर महाबोले व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात तांबे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

