ठाकरे युवा सेनेच्या दणक्यानंतर कुडाळात वीजदुरुस्ती कामे हाती
swt173.jpg
04876
कुडाळ ः ठाकरे युवा सेनेच्या दणक्याने वीज दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली.
ठाकरे युवा सेनेच्या दणक्यानंतर
कुडाळात वीजदुरुस्ती कामे हाती
महावितरणला जागः शहरवासीयांमध्ये समाधान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ः ठाकरे युवा सेनेच्या दणक्यानंतर वीज वितरण कंपनीने शहर बाजारपेठेतील वीज दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने कुडाळवासीयांनी समाधान व्यक्त केले.
शिवसेना व युवा सेना कुडाळ यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी येथील महावितरण कार्यालयावर शहरातील विविध समस्यांबाबत धडक देण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील बाजारपेठेतील विद्युत समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या चर्चेत शहरातील मुख्य बाजारपेठेतील काही वीज खांबांवर होणारे स्पार्किंग व कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, विजेचा खेळखंडोबा याकडे लक्ष वेधून या समस्या सोडवण्याबाबत सर्व्हे करण्याची मागणी केली होती. त्याची तत्काळ दखल महावितरणने घेत अधिकारी व वायरमन यांच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात आला. यामध्ये बाजारपेठेतील खांबांवर असणारे कॉपर कंडक्टर बदलण्याचे काम व इतर कामे तातडीने सुरू करण्यात आली. यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, मेघा सुकी, सुशील चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, दिनार शिरसाट, नितीन सावंत, शुभम महाडेश्वर, अमित राणे, तेजू वर्दम, अशोक किनळेकर, बाळा राऊळ यांनी विशेष पाठपुरवठा केला. या कामाबद्दल बाजारपेठेतील नागरिक व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

