राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटसकडून प्लास्टिकमुक्तीचा संदेश

राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटसकडून प्लास्टिकमुक्तीचा संदेश

Published on

- rat१७p५.jpg
25O04862
राजापूर ः जैतापूर येथे पथनाट्य सादर करताना कॅडेट्स.

राष्ट्रीय छात्रसेनेच्या कॅडेट्सकडून प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जनप्रबोधनावर भर; जैतापूर आठवडा बाजारपेठेत पथनाट्याचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ ः महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीतर्फे राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कोकण विजय मेनू २०२६ कॅम्प राजापूरसह जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात पार पडला. त्यात राष्ट्रीय छात्रसेनेच्या कॅडेट्सनी जैतापूर येथील आठवडा बाजारपेठेत पथनाट्य सादर करत त्या माध्यमातून प्लास्टिकमुक्त परिसर, समुद्री पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक संपत्ती जतन याकडे सार्‍यांचे लक्ष वेधून जनप्रबोधन केले. या पथनाट्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेशही त्यांनी साऱ्यांना दिला.
एनसीसी महाराष्ट्र निर्देशकाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीतर्फे राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय कोकण विजय-मेनू २०२६ कॅम्प नुकताच झाला. या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या ६० एनसीसी कॅडेट्सनी पावस, रनपार, पूर्णगड, आंबोळगड, धाऊलवल्ली, विजयदुर्ग परिसरात स्वच्छता जनजागृती मोहीम राबवली. स्वच्छ कोकण-समुद्र कोकण या घोषवाक्यासह त्यांनी किनारपट्टीच्या स्वच्छतेचे महत्व सांगणारे पथनाट्यही ठिकठिकाणी सादर केले. विजयदुर्ग किल्ल्याच्या भेटीदरम्यान कॅडेट्सनी भारतीय नौदलाचा इतिहास, समुद्रीसुरक्षा, कोकणच्या सागरी परंपरेची माहिती घेतली. त्यासोबत पर्यावरणरक्षण, प्लास्टिकमुक्त पर्यटनस्थळे आणि नैसर्गिक वारसा जपण्याबाबत स्थानिक नागरिकांशी संवादही साधला. या कॅम्पदरम्यान रॅपलिंग, ट्रेकिंग आणि इतर साहसी उपक्रम तसेच समुद्री प्रशिक्षणही पार पडले. या शिबिरादरम्यान भारतीय नौदल अधिकारी, कोस्टगार्ड अधिकारी, आयईएस शाळा व्यवस्थापन व स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. कॅडेट्सच्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्‍या विविध उपक्रमांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com