साठीनंतरही कलारसातून घेतात आनंद

साठीनंतरही कलारसातून घेतात आनंद

Published on

-rat१७p१२.jpg-
२५O०४८८६
पुणे ः शंखवादनमध्ये सहभाग घेतलेले अभय पुरोहित.
----
काही सुखद---लोगो

अभय पुरोहित साठीनंतरही कलारसातून घेतात आनंद
पुण्यात ११११ शंखवादकांच्या विश्वविक्रमी सोहळ्यात सहभाग ; जिद्दीचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ ः आवड असेल तर सवडही मिळते आणि त्यातून आनंदही घेता येतो. फक्त ती आवड किंवा छंद जोपसण्याची मनामध्ये जिद्द असली पाहिजे. देवरूख खालचीआळीतील अभय पुरोहित यांच्याबाबतीत असेच काहीसे म्हणावे लागेल. अभिनय, गायन, वादन अशा विविध कला आज ते वयाच्या साठीनंतरही मोठ्या चिकाटीने जोपासत आहेत. सध्या ते ६९ वर्षाचे आहेत. या वयात त्यांनी गेल्या महिन्यात पुणे येथे झालेल्या विश्वविक्रमी शंखवादन कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
पारंपरिक आणि आध्यात्मिक महत्व जपत पुणे येथील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गेल्या महिन्यात झालेल्या विशेष सोहळ्यात विविध वयोगटातील तब्बल १ हजार १११हून अधिक शंखवादकांनी केलेला नाद विश्वविक्रमी ठरला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये याची नोंद झाली आहे. हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक असा लौकिक असलेला केशव शंखनाद पथकाच्यावतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ब्रह्मनाद, सप्तखंड, अर्धवलय, तुतारी, पूर्णवलय, सुदर्शन आणि मुक्तछंदनाद अशी सात आवर्तने या शंखवादनातून सादर करण्यात आली. या वैशिष्ट्यपूर्ण अशा सोहळ्यात अभय पुरोहित यांनी सहभाग घेतला होता. हे शंखवादनाचे प्रशिक्षण शंखनाद पथकाच्या संगीता भिडे यांच्याकडून त्यांना लाभले होते.
देवरूख आगारातील यांत्रिकी विभागात ते हेडमेकॅनिक होते. २०१४ मध्ये या सेवेतून ते सेवानिवृत्त झाले. अभिनय, गायन आणि वादनकलेची त्यांना खूप आवड आहे. वयाच्या साठीतही पखवाजवादन किंवा शंखवादन असो ती शिकण्याची त्यांची इच्छा व जिद्द कौतुकास्पद आहे.

चौकट
नाट्य अभिनयातही नंबर वन
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन मंडळाच्या २००६ मधील ३५व्या आंतरविभागीय राज्य नाट्यस्पर्धेत रत्नागिरी विभागाने सादर केलेल्या किरवंत या नाटकास प्रथम पारितोषिक मिळाले होते. या नाटकात त्यांनी ‘वेदांतशास्त्री’ ही भूमिका बजावली होती. २०२२ मध्ये कोकण मराठी साहित्य परिषद देवरूख शाखेच्यावतीने घेण्यात आलेल्या संगमेश्वर तालुकास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत अभय पुरोहित यांनी तृतीय क्रमांक पटकावला होता.

कोट
प्रत्येकाने आपल्या अंगी असलेले कलागुण जोपासले तर त्यातून मिळणारा आनंद हा नक्कीच सुखद असतो.
--अभय पुरोहित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com