सांडपाणी निचऱ्यासह विविध समस्या कायम

सांडपाणी निचऱ्यासह विविध समस्या कायम

Published on

निवडणुक पानासाठी

swt1710.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ -
04934
कणकवली : शहरातील शिवाजीनगर, परबवाडी भागातील सांडपाणी रेल्‍वे हद्दीकडील नाल्‍यामध्ये साठून राहत आहे.

टीपः swt1711.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ -
4935
कणकवली : शहरातील शिवाजीनगर येथील उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असून काही खेळणी मोडकळीस आली आहेत.

सांडपाणी निचऱ्यासह विविध समस्या कायम
प्रभाग चारमधील स्थिती ः निवडणुकीनंतर चित्र बदलणार का0
राजेश सरकारे ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १७ ः अनेक निवासी संकुलांची दाटी असलेल्‍या प्रभाग चारमध्ये परबवाडी, शिवाजीनगर आणि जळकेवाडीचा समावेश होतो. या भागात सांडपाण्याचे कसलेच नियोजन नसल्याने अनेक विहिरी प्रदूषित झाल्या. परबवाडीतील अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. जागा मिळेल तिथे घरे आणि कॉम्लेक्सची उभारणी झाल्याने सांडपाणी व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्‍न येथील नागरिकांना भेडसावत आहे. सांडपाणी गटारांमध्येच साचून राहत असल्‍याने डासांचा मोठा प्रादुर्भाव या प्रभागातील नागरिकांना आहे.
शहरातील जुना आणि नरडवे रस्ता दरम्यान वसलेल्या शिवाजीनगर आणि परबवाडीमध्ये गेल्या काही वर्षात बेसुमार निवासी संकुलांची बांधकामे झाली. नगरपंचायत नियमानुसार या संकुलातील सांडपाणी निचरा होण्यासाठी संकुल परिसरात शोषखड्डे खोदण्यात आले. परंतु, त्यांची पाणी धारण क्षमता संपल्याने, हे सांडपाणी उघड्या गटारातून वाहत आहे. परबवाडी, शिवाजीनगर भागात अनेक ठिकाणी हे सांडपाणी साठून राहत आहे. त्यामुळे डासांचा फैलाव इथे मोठ्या प्रमाणात आहे.
मागील पाच वर्षात शिवाजीनगर, परबवाडीतील सांडपाणी प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी काही प्रमाणात गटारांची बांधकामे करण्यात आली. त्‍यामुळे येथील विहिरींत सांडपाणी मुरण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात मार्गी लागला. मात्र, ही गटारे मुख्य नाल्‍याला जोडण्यात आलेली नाहीत. त्‍यामुळे शिवाजीनगर, परबवाडीतील सांडपाणी रेल्‍वे हद्दीकडील नाल्‍यामध्ये साठून राहत आहे. त्‍यामुळे पुढील काही वर्षात रेल्‍वे हद्द परिसरातील विहिरी प्रदुषित होण्याचा धोका आहे.
परबवाडीतील कामतसृष्टी, विष्णू अपार्टमेंट तसेच निसर्ग अपार्टमेंटमधील परिसरातील गटारे पूर्ण करण्यात आली. मात्र, तीव्र उतारावर येथील संकुले आहेत. मुसळधार पावसाच्या कालावधीत येथील संकुलांमध्ये, घरांमध्ये तसेच विहिरींमध्येही पाणी जाण्याचा धोका कायम राहिला आहे. शहरातील मधलीवाडी, परबवाडी, शिवाजीनगर, पोयेकरवाडी या भागातील पावसाचे पाणी तसेच सांडपाणी सखल भाग असलेल्या परबवाडी परिसरात येते. येथील सांडपाणी वाहून नेण्यासाठी नगरपंचायतीने पोयेकरवाडी ते परबवाडी मार्गे नाथ पै नगरपर्यंत भूमिगत गटार योजना कार्यान्वित केली. मात्र, ही योजना परबवाडी रेल्‍वे हद्द पर्यंतच पूर्ण झाली. हे गटार नवीन रेल्‍वे स्थानकातून जाणाऱ्या नाल्‍याला जोडण्यात आलेले नाही.
शिवाजीनगर येथील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी छोटे उद्यान बांधण्यात आले आहे. मात्र, या उद्यानातील खेळणी मोडकळीस आली आहेत. उद्यानाची निगा देखील राखली जात नाही. याच उद्यानात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेची टाकी आहे. या उंच टाकीवर जाण्यासाठी असलेले गेट खुले असल्‍याने सुरक्षेच्या कारणास्तव इथले नागरिक देखील मुलांना या उद्यानामध्ये पाठवत नाहीत.
शहरातील परबवाडी, शिवाजीनगर या भागात रस्ते आहेत. परंतु कुठेच गटार व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी रस्त्यांवरूनच वाहून जाते. त्यामुळे या ठिकाणचे रस्ते दरवर्षी खड्डेमय होत आहेत. त्याचा मोठा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. शिवाजीनगरचा भाग उंचावर असल्याने येथील विहिरींना पाणीही कमी आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या नळयोजनेवरच येथील नागरिकांना अवलंबून राहावे लागते. यात उन्हाळ्यात पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते.
प्रभाग चारमधील आमणे घर ते नगरपंचायत इमारत परिसरात उघडी गटारे आहेत. या गटारांमध्ये बाराही महिने सांडपाणी साठून राहत असल्याने या परिसरात सततची दुर्गंधी पसरत आहे. तसेच उघड्या गटारांमुळे सतत अपघातांचीही शक्यता निर्माण होत आहे. परंतु, त्याबाबत कोणतेही नियोजन नगरपंचायतीकडून अद्याप झालेले नाही. दाटीवाटीचा परिसर आणि खासगी जागा संपादन करण्यासाठी नगरपंचायतीकडे असलेला अपुरा निधी यामुळे रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण वगळता या प्रभागात कोणतेही नवीन काम गेल्या दहा वर्षात मार्गी लागलेले नाही. दरम्यान, आम्हाला विकासकामे नकोत, पण सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्‍न तरी मार्गी लावा, अशी विनंती सातत्याने या भागातील नागरिकांतून होत आहे.
------------
कोट
शहरातील शिवाजीनगर हा उंच भाग आहे. पूर्वेकडील परबवाडी आणि पश्‍चिमेकडील जळकेवाडी हा सखल भाग आहे. या गटारातील सांडपाणी समस्या मार्गी लावण्यासाठी नगरपंचायतीने सक्षम आणि बंदिस्त गटार योजना करायला हवी. त्‍याला नागरिकांकडूनही सहकार्य मिळायला हवे. याखेरीज शिवाजीनगर ते कणकवली कॉलेजपर्यंत जाण्यासाठी रस्ता होण्याची गरज आहे.
- दिलीप हिंदळेकर, शिवाजीनगर
------------------
* मतदार : ६७२
* आरक्षण- ओबीसी महिला
* प्रभागातील समाविष्ट भाग परबवाडी, शिवाजीनगर
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com