फिरस्ती
फिरस्ती----------लोगो
मलमपट्टी केली असती तर?
सध्या पालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नगराध्यक्ष-नगरसेवकांसाठी उमेदवारांचे मनसुबे आखण्याला सुरुवात झाली. उमेदवारी भरण्यासाठी बुजुर्ग तसेच नवयुवक पुढे येत आहेत. बुजुर्ग आपण अनेक वर्षे केलेल्या कार्याचे मनसुबे रचत आहेत. पुन्हा एकदा ताकदीने किमान नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत. पालिकेला पडलेल्या स्त्री आरक्षणामुळे काहीसे नाराज; पण शहराचा ‘नक्शा’ बदलायची उमेद घेऊन एका प्रभागातील बुजुर्ग तात्या आपली दुचाकी घेऊन शहरात फेरफटका करावा म्हणून सकाळीच निघाले. मारुती मंदिर रस्त्यावर वळणावर खड्ड्यात आपटून पडले. किरकोळ जखमी झाले. वाहनचालकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तात्यांना पाहायला अनेक मंडळी रुग्णालयात दाखल झाली; पण तात्या तसे मिश्कीलच त्यांनी त्यामध्ये नातेवाइकांसह आलेल्या मंडळींना सुनावलेच, कशाला मलमपट्टी करताय.... त्यापेक्षा रस्त्याला नीट मलमपट्टी केली असती तर?

