माजी मुख्याध्यापिका सुर्वेंचा सत्कार
05081
माजी मुख्याध्यापिका सुर्वेंचा सत्कार
सावंतवाडी, ता. १८ ः मळगाव येथील शारदा विद्यालय रस्तावाडा शाळेच्या माजी मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता सोहळा शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात झाला. आठ वर्षांच्या कार्यकाळात सुर्वे यांनी शाळेला जिल्हास्तरीय यश, आधुनिक सुविधा आणि आदर्श शाळेचा मान मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, सीताराम सुर्वे, शाळेच्या शिक्षिका सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, सिद्धी कुडव, विजय ठाकूर, श्री. तेली, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सुर्वे दांपत्याचा शाल, साडी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ओटी भरून औक्षण करण्यात आले. शाळेतर्फे पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, फॅन व फोटो फ्रेम भेट देऊन सुर्वे यांचा गौरव केला.
......................
05091
वक्तृत्व स्पर्धेत सर्वेक्षा ढेकळेचे यश
सावंतवाडी ः सेवाभावी भारतीय संस्था, सावंतवाडीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी सर्वेक्षा ढेकळे हिने पाचवी ते सातवी या गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ‘बालपण हरवत चाललंय’ या विषयावरील ही स्पर्धा पंचम खेमराज महाविद्यालयात झाली. यावेळी सर्वेक्षा हिला रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले.

