स्नेहसंमेलनासाठी ‘रत्नसिंधू’ सज्ज
05092
कुडाळ ः येथे आयोजित बैठकीस उपस्थित जलसंपदा विभागाचे निवृत्त कर्मचारी.
स्नेहसंमेलनासाठी ‘रत्नसिंधू’ सज्ज
जानेवारीत कार्यक्रम; कुडाळ बैठकीत आढावा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः ‘रत्नसिंधू’ निवृत्त कर्मचाऱ्यांचे दुसरे स्नेहसंमेलन कुडाळ येथे ११ जानेवारीला आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी रविवारी (ता. १६) श्रीराम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे जलसंपदा (पाटबंधारे) विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक झाली.
कुडाळ येथे होणाऱ्या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभागाचे माजी सचिव दे. प. शिर्के, माजी मुख्य अभियंता तथा कार्यकारी संचालक बी. बी. पाटील, माजी मुख्य अभियंता पी. एम. अबनावे, माजी मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, माजी अधीक्षक आर. डी. शिंदे, आर. एम. संकपाळ, माजी कार्यकारी अभियंता एन. एस. चव्हाण, भरत रेडकर, श्री. लवेकर, एम. आर. मेटकरी, श्री. रेळेकर, साजन रावळ उपस्थित राहणार आहेत. बैठकीला राजू तावडे, राजन वालावलकर, संजय शेणई, कमलाकर ऊर्फ किशोर साळगावकर, सखाराम सपकाळ, ॲड. जयसिंग वारंग, मायकल डिसोझा, रत्नाकर दामले, वासुदेव सडवेलकर, गुरुदास केसरकर, सुरेश वर्धम, भगवान केसरकर आदी उपस्थित होते.
यावेळी विविध समित्यांच्या प्रमुखांची निवड करण्यात आली. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित करण्याचे ठरले. या स्मरणिकेमध्ये सभासदांच्या लेखनाला प्राधान्य दिले जाईल. ‘गुगल लिंक’द्वारे सभासद नोंदणी केली जाईल. स्नेहसंमेलनाच्या दुपारच्या सत्रात निवृत्त कर्मचाऱ्यांच्या करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संमेलनासाठी कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हा येथून पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

