स्वरचित कवितांनी दिला नवा आत्मविश्वास
05094
स्वरचित कवितांनी दिला नवा आत्मविश्वास
‘राधारंग’चा उपक्रम; मळगावच्या स्पर्धेत नैतिक प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः मळगाव येथे आयोजित स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत बांदा खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी नैतिक मोरजकर याने प्रथम, मळगाव इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी हर्षिता राऊळ हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्गतर्फे (कै.) सौ अनुराधा अनिल (हरी) तिरोडकर स्मृती प्रित्यर्थ मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेच्या चिंतन, हेमंत, शैलजा परब सभागृहात ही स्पर्धा झाली. ‘पाऊस’ हा स्पर्धेतील कवितेचा विषय होता. व्यासपीठावर राधारंग फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, माड्याचीवाडी मुख्याध्यापक दीपक सामंत, मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक एम. बी. फाले, राधारंग फाउंडेशनचे सदस्य अरुणा सामंत, प्रथमेश नाईक, खजिनदार सचिन सामंत, सदस्य गुरुनाथ नार्वेकर, परीक्षक शंकर प्रभू मंगल नाईक-जोशी उपस्थित होते.
---
स्पर्धेचा इतर निकाल
तृतीय क्रमांक गौरी गावडे (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास क्र. १), उत्तेजनार्थ सानवी देसाई (बांदा खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूल) यांनी यश मिळविले. प्रथम क्रमांकास १५०० व चषक, द्वितीय १००० व चषक, तृतीय ७०० व चषक, उत्तेजनार्थ क्रमांकास ५०० रुपये व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविले.

