कोकण
डिगस येथे आज वार्षिक जत्रोत्सव
05095
डिगस येथे आज
वार्षिक जत्रोत्सव
कुडाळ, ता. १८ ः डिगस (ता. कुडाळ) येथील ग्रामदेवता श्री देवी काळंबा (कालिका) मंदिरात उद्या (ता. १९) वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ‘श्रीं’ची पूजा, धार्मिक कार्यक्रम, नवस बोलणे-फेडणे, ओटी भरणे, रात्री अकाराला ‘श्रीं’चा सवाद्य पालखी सोहळा, बाराला आजगावकर दशावतारी नाट्य मंडळाचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डिगस ग्रामस्थांनी केले आहे.

