‘विज्ञानरथम’ उपक्रमांतून विज्ञान जागृती

‘विज्ञानरथम’ उपक्रमांतून विज्ञान जागृती

Published on

05082
कुडाळ ः इनरव्हील क्लबच्या ‘विज्ञानरथम’ उपक्रमांतर्गत तामिळनाडू येथून दाखल झालेल्या विज्ञान बससमवेत अध्यक्षा सानिका मदने, डॉ. सायली प्रभू, नवीनकुमार. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘विज्ञानरथम’ उपक्रमांतून विज्ञान जागृती

सानिका मदने ः पणदूर तिठा विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः कुडाळ इनरव्हील क्लब ऑफ, इनरव्हिल डिस्ट्रिक्ट ३१७ व रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू यांच्यावतीने आयोजित ‘विज्ञानरथम’ उपक्रमांतर्गत न्यू शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा येथील ७०० विद्यार्थी व ४० शिक्षकांना विज्ञान विषयक विविध प्रयोग व माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इनरव्हील क्लबचा ‘विज्ञानरथम’ प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कुडाळ इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अध्यक्ष सानिका मदने यांनी केले.
यावेळी माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. सायली प्रभू, रोटरी क्लब ऑफ विरूधम तामिळनाडूचे समन्वयक नवीनकुमार व सहकारी, न्यू शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठाचे संस्था चेअरमन आपासाहेब गावडे, सचिव नागेंद्र परब, संचालक एम. एस. पाटील, पर्यवेक्षक मिलिंद कर्पे उपस्थित होते.
डॉ. प्रभू म्हणाल्या, ‘विज्ञानरथम हा प्रोजेक्ट तामिळनाडूतील रोटरी क्लब ऑफ विरूधनगर या क्लबने इधयम सेवा ट्रस्टमार्फत दक्षिण भारतातील हजारो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयक विशेष रूची वाढावी, या उद्देशाने घेण्याची कामगिरी केली आहे. इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांनी सर्व इनरव्हील क्लबना या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळा निवडण्याचे आवाहन केले होते. कुडाळमध्ये न्यू शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा व कुडाळ हायस्कूल या दोन शाळांची निवड करण्यात आली. गोव्यातील शाळांना हा रथ दाखवणार आहेत.’
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग दाखवितानाच वैज्ञानिक अभिरुची निर्माण करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक करिअर घडविण्याचे प्रेरणादायी कार्य कुडाळ इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सुरू आहे, असे सांगत पालक व संस्था पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Marathi News Esakal
www.esakal.com