रत्नागिरीत ३९ अपक्ष निवडणूक रिंगणात
रत्नागिरीत ३९ अपक्ष निवडणूक रिंगणात
नगराध्यक्षपदासाठी तिघे ; मत विभाजनाचा धोका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : रत्नागिरी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बंडखोरी उफाळून आली असून, ३२ जागांसाठी वेगवेगळ्या प्रभागातून ३९ अपक्ष रिंगणात उतरले आहेत. इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने अपक्षांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. माघारीपर्यंत अपक्ष रिंगणात राहिल्यास महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतविभाजनाचा मोठा धोका आहे. नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्षपदासाठी तीन अपक्ष रिंगणात आहेत.
रत्नागिरी पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज भरण्याचा काल (ता. १७) अखेरचा दिवस होता. त्यामुळे इच्छुकांची निवडणूक केंद्रावर अर्ज भरण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली. थेट नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीबरोबर अपक्षांनी या पदासाठी कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीकडून सुस्मिता शिंदे रिंगणात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून वाहिदा मुर्तुजा रिंगणात आहेत. प्राजक्ता किणे, संध्या कोसुमकर, तौफिका मजगावकर या तीन उमेदवार रिंगणात आहेत तर पालिकेच्या ३२ जागांसाठी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. बहुतेक प्रभागात ही बंडखोरी दिसत आहेत. प्रभाग १ मध्ये प्रणाली रायकर, श्रेय्या शिंदे, मिलिंद साळवी. प्रभाग ३ मतीन याकुब सत्तार बावानी आणि हीना बावानी हे दाम्पत्य रिंगणार आहे. प्रभाग ४ मध्ये रहिल मुकादम, रोहन वरेकर, रफइक मुकादम, वक्रतुंड उमेश शेट्ये, इम्रान नेवरेकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग ५ मध्ये अभिलाष पिलणकर, सरिता कदम, मंजुळा कदम दोन अर्ज भरले आहेत. प्रभाग ६ मध्ये प्राजक्ता रूमडे, नीलेश आखाडे. प्रभाग ७ नितीन माईण, प्राजक्ता रूमडे. प्रभाग ८ मध्ये सोमनाथ पिलणकर, शाहित वस्ता, शुभम सोळंकी. प्रभाग ९ मध्ये कल्पना मसुरकर, संध्या कोसुमकर, कामना बेग. प्रभाग १० मध्ये संपदा रसाळ, सचिन शिंदे. प्रभाग ११ तुषार कांबळे. प्रभाग १२ मध्ये मैथिली मयेकर, करण नागवेकर, सचिन तळेकर. प्रभाग १३ प्रसाद भुते, प्रभाग १४ श्रीनिवास तळेकर, आशिष मोरे. प्रभाग १५ मध्ये अस्मिता चवंडे, संकेत चवंडे हे ३९ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कोण कोण रिंगणात राहणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

