‘बाल डाक चौपाल’चा ९० विद्यार्थ्यांना फायदा
05096
‘बाल डाक चौपाल’चा
९० विद्यार्थ्यांना फायदा
कुडाळात बालदिनी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः बालदिनाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ येथे डाक विभागाच्या माध्यमातून ‘बाल डाक चौपाल’ उपक्रम झाला. यामध्ये डाक विभागाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमात ९० विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले.
डाक-विकास अधिकारी समीर पांगुळ यांनी भारतीय डाक विभागात सुरू असलेल्या सर्व वित्तीय सेवा, ‘आयपीपीबी’मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स यातील गुंतवणूक कशी फायदेशीर व सुरक्षित आहे, याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी सिस्टम अॅडमिन हरी वेंगुर्लेकर, सिद्धेश चव्हाण, संतोष मिराशे, अनन्या गोलतकर, मानसी गंगावणे उपस्थित होते. या कार्यक्रमास पोस्ट विभागाचे अधिकारी नितीन नेमळेकर यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै महिला कॉलेजचे प्राचार्य अरुण मर्गज, सी.बी.एस.ई. सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर यांनी डाक विभागाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

