६५ हजारात उभी राहिली पालिकेची इमारत
- rat१८p२.jpg-
२५O०५०६५
चिपळूण नगरपालिका इमारत.
-----
फ्लॅश बॅक-------------लोगो
चिपळूणची १४८ वर्षातील वाटचाल--------भाग २
चिपळूण नगरपालिकेच्या इतिहासात स्व. रावसाहेब खातू यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक अडचणींवर मात करून अवघ्या ६५ हजार रुपयांत उभी राहिलेली इमारत, तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या हुशारी आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे.
- मुझ्झफर खान, चिपळूण
---
पालिकेची इमारत ६५ हजारात उभी राहिली
स्व. रावसाहेब खातू १९४० मध्ये अध्यक्ष असताना सध्याची इमारत बांधण्यात आली. त्यासाठी ६५ हजार रुपये खर्च आला. आजच्या जमान्यात या पैशात साधी स्कूटरही येत नाही; पण तेव्हा बांधकामावेळी नगरपालिकेची आर्थिक स्थिती कोलमडलेली होती. घाटावर सुरू झालेल्या रेल्वेमुळे इकडचा व्यापार कमी झाला होता. कोल्हापूर, सांगली भागातील माल थेट रेल्वेने मुंबईस जाऊ लागला आणि समुद्रमार्गे व्यापार कमी झाल्याने अर्थातच नगरपालिकेचा टर्मिनल टॅक्सही कमी झाला. दैवयोगाने रेल्वेने भाडेदर दुप्पट केल्याने घाटावरचा माल पुन्हा चिपळूणला येऊ लागला आणि टर्मिनल टॅक्सचे जवळजवळ चौसष्ट हजार रुपये मिळून इमारत बांधली गेली. त्या वेळीही प्रशासन आडवे आले होते; परंतु हुशारीने त्यावरही या लोकप्रतिनिधींनी मात करून जागा मिळवली. त्या वेळी शेंगदाणे व्यापार मोठा होता. त्याच्या टॅक्सवर इमारत झाल्याने गमतीने पालिकेच्या इमारतीला शेंगदाणा बिल्डिंग नाव पडले. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर रावसाहेब खातू यांनी अध्यक्षपद सोडले. रावसाहेब खातू यांनी तर नगरपालिकेवर राष्ट्रध्वजही फडकावला होता. १९७६ पूर्वी चिपळूणमध्ये लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या जागेत नेटिव्ह लायब्ररी होती. ती जागा संस्थेला देऊन तेथेही इमारत बांधली गेली तसेच प्राथमिक शाळेसाठी १८९४ ला चिंचनाक्यावरील प्राथमिक शाळेची इमारत बांधण्यात आली. ही इमारत बांधण्याअगोदर तेथील घरामध्ये शाळा सुरू होती. ज्यामध्ये लोकमान्य टिळक यांचे वडील गंगाधरपंत काही काळ शिक्षक होते. १९०५ नंतर चिपळूणमध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा बांधल्या गेल्या. त्यांना नगरपालिकेचे अनुदान दिले गेले. बाजारात अर्बन बँकेपासून अगदी मापारी मोहल्ल्यापर्यंत गाडीतळ होते. अक्षरशः हजारो बैलगाड्या यायच्या. त्यातून व्यापारी माल यायचा व जायचा. त्यामुळे उत्पन्न मिळत असे. नंतरच्या काळात १९५०च्या सुमारास मोटारगाड्या आल्याने हळू बैलगाड्या कमी झाल्या. आता तर एकही बैलगाडीने वाहतूक होत नाही. स्व. अण्णासाहेब खेडेकर अध्यक्ष असताना १९५०च्या सुमारास ऑक्ट्राय कर सुरू करण्यात आला. त्याला तत्कालीन व्यापाऱ्यांचा विरोध होताच; पण संवादाने तो विरोध मावळला. कै. बबनशेठ पाथरे याच्या कारकिर्दीमध्ये १९५९मध्ये बाजार खाडीवर कॉजवे (पूल) बांधण्यात आला तसेच १९५२ला चिपळुणात विजेचे प्रस्थ सुरू झाल्याने यावरील तेलाचे दिवे काढून विजेचे खांब बसवून विजेचे दिवे लावण्यात आले तसेच १९५५ नंतर वाड्यांमध्ये पाखाड्या वाटा बांधायला सुरुवात झाली. या वेळेपर्यंत विशेषतः वकीलवर्गाच्या हातात सत्ता असायची; पण नंतर ग्रामीण भागातून स. गो. भोसले यांच्या रूपाने नेतृत्व पुढे आले. कै. स्व बाबुलाल ओसवाल, रामभाऊ मिरगल, पैंगबरवासी आर. डी. कास्कर, स्व. दत्तोपंत सोमण, स्व. कृष्णा कड़वेकर, स्व. पी. एस. चितळे अशा अनेक व्यक्तिमत्त्वांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये नगरपालिकेच्या विकासात योगदान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

