प्रत्येक घटाकपर्यंत न्याय पोहोचला पाहीजे

प्रत्येक घटाकपर्यंत न्याय पोहोचला पाहीजे

Published on

‘प्रत्येक घटकापर्यंत
न्याय पोचला पाहिजे’
मंडणगड ः समाजातील प्रत्येक शोषित व वंचित घटकांपर्यंत न्यायव्यवस्था आणि शासनाच्या विविध योजना पोहोचवणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मंडणगडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश अमृता जोशी यांनी केले. तालुका विधी सेवा समिती दापोली व दिवाणी न्यायालयातर्फे तिडे-आदिवासीवाडीत कायदेशीर लोकजागृती कार्यक्रम घेण्यात आला. न्यायाधीश जोशी यांनी या ग्रामीण व दुर्गम परिसरातील आदिवासी बांधवांना न्यायव्यवस्थेतील विविध योजना, विशेषतः राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येत असलेल्या मोफत विधी सेवा आणि लोकअदालती याबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मिलिंद लोखंडे, गटविकास अधिकारी श्री. ए. बी. खरात, ॲड. दीपांजली धाडवे, ॲड. राकेश साळुंखे, ॲड. किरण कांबळे, ॲड. श्रीकृष्ण जाधव, सरपंच श्रीमती धनसे उपस्थित होते.

बांबू वनशेतीवर
कौशल्य कार्यशाळा
मंडणगड ः तालुक्यातील वेरळ आणि पालवणी या गावांमध्ये नैसर्गिक शेती आणि बांबूआधारित वनशेतीविषयी एकदिवसीय हरितकौशल्य विकास कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे आयोजन नवनागरिक युवा विकास केंद्र (NYCC) आणि ट्रीपल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. वाढत्या शेतीखर्चाचा प्रश्न आणि कोकणात रोजगार निर्मितीच्यादृष्टीने बांबू आधारित वनशेती हा एक प्रभावी पर्याय असल्याची चर्चा कार्यशाळेत झाली. नैसर्गिक शेतकरी उत्पादक संघ, महिलांचे स्वयंसहाय्यता गट आणि क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी या वेळी सक्रिय सहभाग घेतला. कार्यशाळेनंतर डिसेंबरमध्ये माती परीक्षण मेळावा, बांबू लागवड नियोजनासाठी भूमी सर्वेक्षण आणि वडवली येथील भावेश कारेकर यांच्या बांबू व्हिलेज इंडिया प्रकल्पाला शेतकरी अभ्यास सहलीतून भेट देण्याचे नियोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये शुभम गुरव (क्लायमेट चॅम्पियन), ट्रीपल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक भावेश कारेकर, संगीत बने, भरारी उद्योजिका गटाच्या अध्यक्षा किमया जोशी आदी उपस्थित होते.

नरेंद्रचार्यजी महाराजांचे
रविवारी प्रवचन
गुहागर ः जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा रविवारी (ता. २३) सायंकाळी ५ वा. पाटपन्हाळे हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. या प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचा सर्व गुरूबंधू-भगिनी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामानंद संप्रदाय भक्तसेवा मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com