चिपळुणात छाननीत तीन अर्ज बाद
चिपळुणात छाननीत १६ अर्ज बाद
शरद पवार गटाला धक्का ; काँग्रेसकडून दोघांना एबी फॉर्म
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः चिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या अर्जाच्या छाननीत तीन अर्ज बाद झाले तर नगरसेवकपदासाठी १३ अर्ज अवैध ठरले आहेत. गोवळकोट येथे तगड्या उमेदवाराचा अवैध ठरल्याने शरद पवार गटास धक्का बसला. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी दोघांनाही एबी फॉर्म दिल्याने मुख्य उमेदवाराची मोठी अडचण झाली आहे.
चिपळूण पालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी एकूण १३ अर्ज दाखल झाले होते. यातील तीन अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. त्यामुळे आठ जणांचे १० अर्ज वैध राहिले आहे. दुसरीकडे नगरसेवकपदासाठी एकूण १५४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ जणांचे अर्ज बाद ठरल्याने १४१ अर्ज वैध ठरले आहेत. नगरसेवकपदासाठी एकूण १२९ उमेदवार रिंगणात आहेत. २१ नोहेंबरपर्यंत यातील किती उमेदवार माघारी घेणार, याकडे लक्ष लागले आहे. गोवळकोट येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारास एबी फॉर्म योग्यरित्या न लिहिल्याचा फटका बसला. प्रभाग क्रमांक अचूक न लिहिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. नगराध्यक्षपदासाठी राजेश देवळेकर, विनिता सावर्डेकर, लियाकत शहा यांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरले तरी त्यांनी दोन-दोन अर्ज भरल्याने त्यांना धोका नाही. नगरसेवकपदासाठी दिशा कदम, दीपक निवाते, मुनीर सहीबोले, अ. कादीर मुकादम, नितीन गोवळकर, सुवर्णा साडविलकर, महमंद पाते, युगंधरा शिंदे, अंकुश आवले, सुधीर शिंदे यांचे अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. यातील बहुतांशी उमेदवारांनी दोन-दोन अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून निशिकांत भोजने, काँग्रेसतर्फे लियाकत शहा, सुधीर शिंदे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम, ठाकरे गटाचे राजेश देवळेकर, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मिलिंद कापडी, शिवसेना शिंदे गटाचे उमेश सकपाळ, पेचकर हे उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

