इनडोअर मैदान, स्विमिंग पूल सारखी कामे पूर्ण करणार

इनडोअर मैदान, स्विमिंग पूल सारखी कामे पूर्ण करणार

Published on

इनडोअर मैदान, स्वीमिंग पूलाची
कामे पूर्ण करणार ः आमदार निकम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १९ ः इनडोअर मैदान, ओपन मैदान, स्वीमिंग पूल यासारखी महत्त्वाकांक्षी कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, उर्वरित विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले. तसेच महायुतीबाबत मनात शंका असलेल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले, चिंता करू नका, दिलेला शब्द पाळण्यासाठी मी नेहमीच ठाम असतो.
देवरुख नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. याप्रसंगी आमदार निकम म्हणाले, राजकारण असो वा कोणतेही क्षेत्र, एकदा शब्द दिला की माघार नाही. त्यात माझे कितीही नुकसान झाले तरी मी कधीच मागे फिरत नाही. नागरिकांनी रामेश्वर मंदिर परिसर, नदी घाट, स्मशानभूमी या काही महत्त्वाच्या विकास कामांबाबत सूचना मांडल्या. या सभेला रोहन बने, राजेंद्र सुर्वे, राजेंद्र पोमेंडकर, तुकाराम येडगे, हनिफशेठ हरचिरकर, अभिजित शेट्ये, मृणाल शेट्ये, नीलेश भुरवणे, सुशांत मुळ्ये, बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com