खेड–भरणे रस्त्यावरील धुळीवर पाण्याचा उतारा
- rat१९p११.JPG-
P२५O०५३८८
खेड- भरणे रस्त्यावर धूळ उडू नये, यासाठी टाकण्यात आलेले पाणी.
----
‘खेड–भरणे’वरील धुळीवर पाण्याचा उतारा
पादचारी-वाहनचालकांना तात्पुरता दिलासा ; दुपारनंतर पुन्हा त्रास
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ : दापोली-खेड-भरणे या मुख्य मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे, खडीचे उडणारे तुकडे आणि त्यावर भर म्हणून उठणारी प्रचंड धूळ यामुळे वाहनचालक, पादचारी आणि रस्त्यालगतची दुकाने–घरे यातले रहिवाशांना सतत त्रास होत आहे. या धुळीपासून तात्पुरता दिलासा देण्यासाठी पाण्याचा फवारा मारण्यात येत आहे. त्यामुळे काही तासांसाठी धूळ खाली बसली असली, तरीही दुपारनंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच होत आहे.
दापोली-खेड-भरणे या मुख्य मार्गावर सतत वाहतूक सुरू असते. या रस्त्याची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे दुरवस्था झालेली आहे. पावसाळा उलटून गेल्यानंतर या मार्गावर प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या धुळीपासून तात्पुरता दिलासा देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान ते मैत्री पार्कदरम्यान प्रशासनाकडून पाण्याचा फवारा मारण्यात आला. काही तासांसाठी धूळ खाली बसली असली, तरी दुपारनंतर वाहनांच्या वर्दळीबरोबर पुन्हा धुळीची तीव्रता वाढून श्वास घेणेदेखील कठीण झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम काही दिवसांपूर्वीच सुरू झाले होते. मात्र ते अर्धवट राहिल्याने अनेक खड्डे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकून जैसे थेच राहिले आहेत. बारीक खडी टाकलेल्या ठिकाणी विशेषतः धूळ अधिक उडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. खड्डे परवडतील, पण धूळ नको, अशी परिस्थिती बनली असून दुकानदार आणि स्थानिक नागरिकांकडून प्रखर नाराजी व्यक्त होत आहे. तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी रस्त्याचे हॉट मिक्सिंगद्वारे डांबरीकरण तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

