चिपळूणच्या व्यापाऱ्यांकडून जकात रद्दचे स्वागत
(पान २ साठी, सरकारनामासाठी)
फ्लॅश बॅक - लोगो
चिपळूणची १४८ वर्षांतील वाटचाल - भाग ३
इंट्रो
१९९८ साली तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील जकात रद्द करण्याचा धाडसी ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे प्रशासन नाराज झाले. परंतु, चिपळूणचे व्यापारी खूष झाले. त्यांनी राणे यांच्या निर्णयाचे स्वागत केले होते..!
- मुझफ्फर खान, चिपळूण
--------
चिपळूणच्या व्यापाऱ्यांकडून
जकात रद्दचे स्वागत
जकात कराचे पैसे दरवर्षी महाराष्ट्र शासन पालिकेकडे वर्ग करीत असे. १९७२ साली स्व. श्रावणशेठ दली थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले. त्यांनी जनता, पालिकेतील अधिकारी आणि सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊन अनेक योजना राबविल्या. चिपळूण शहराच्या मध्यभागी दक्षिणोत्तर वाहणारी शिवनदी, पूर्व-पश्चिम वाहणारी मोठी वाशिष्ठी नदी, तीनही बाजूला डोंगर, मध्ये शेती. उंच भागात नागरी वस्ती व व्यापार, असे चित्र त्यावेळी होते. १९८० नंतरच्या लोटे औद्योगिक वसाहतीमुळे चिपळूण झपाट्याने बदलू लागले. पहिली अपार्टमेंट भिंगार्डे यांनी मार्कडी परिसरात १९८६ला बांधली. त्यानंतर गेल्या ३८ वर्षांत शेकडो इमारती अगदी खाजण भागातही बांधल्या गेल्या. अर्थात जमिनीला दर येऊ लागल्याने शेतकरी आपल्या जमिनी विकू लागला. या इमारतींमुळे अर्थातच नगरपालिकेस उत्पन्न स्त्रोत मजबूत सुरू झाला. जरी खाडीमार्गे व्यापार थांबू लागला, तरी रस्त्यांवरून माल मोटारींच्या वाहतुकीने बाजारही विकसित झाला. सुरवातीस भेंडीनाका चौकी, प्रभात गल्ली, गांधी चौक परिसरात असणारा व्यापार अर्बन बँक, नगरपरिषद, चिंचनाका परिसरात पसरला. आता तर थेट भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत, तसेच पागनाक्यापर्यंत बाजार विकसित झाला आहे. या सर्व उलाढालींमुळे अर्थातच नगरपालिकेस आता उत्पन्न चांगले आहे. खर्चही वाढला आहे. पाणी योजना खर्चिक व तोट्यात असते. आरोग्य सुविधा खर्चिक असतात, विकास कामांकरिता केंद्र व राज्य शासन दरबारी अवलंबून राहावे लागते. अर्थात विधानसभा, लोकसभा प्रतिनिधी त्याकरिता तत्परतेने कामे करतात, हे आपले सुदैव आहे.
चिपळूण शहरात पाण्याच्या टाक्या, भाजी मंडई, मटण मार्केट, रुग्णवाहिका सेवा, साने गुरुजी उद्यान, पाग मराठी शाळा, टोपलीचे संडास बंद करून सेप्टीक टँकचे संडास बांधणे, सफाई कामगारांसाठी नवीन गाड्यांची सुविधा अशी अनेक कामे त्यांनी केली. त्यांच्या कारकिर्दीत नगरपालिकेचा शताब्दी सोहोळा तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत केला गेला. त्यानंतर काही काळ प्रशासकीय कारभार होता. १९८५ साली पुन्हा निवडणूक झाली. स्व. अॅड. शांताराम बुरटे नगराध्यक्ष झाले. त्यांच्या काळात गोवळकोट पाणी योजना राबविण्यात आली. त्यानंतर रमेश कदम यांचा कार्यकाळ १९८८ पासून सुरु झाला. अॅड. बुरटे यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक बंद महिला मंडळ इमारत स्व. आमदार नानासाहेब जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थापित केली होती. रमेश कदम दीर्घकाळ चिपळूण पालिकेचे नेतृत्व करताना अध्यक्ष राहिले आहेत. गेली तीस-पस्तीस वर्षे त्यांच्याचभोवती पालिकेचे सारे राजकारण फिरते आहे. ते पायऊतार झाल्यावर श्रीमती हेमलता बुरटे, दर्शना कांबळी, श्रीमती उषा लवेकर, सावित्री होमकळस, रिहाना बिजले, सुरेखा खेराडे महिला नगराध्यक्षा पालिकेस लाभल्या. सुचयअण्णा रेडिज, अजमल पटेलही नगराध्यक्ष होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

