कोकण विजय मोहिमेतील अनुभव रोमांचक
rat19p23.jpg
05449
पावस ः उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांच्या गटाचा सत्कार करताना कमांडर.
----------
कोकण विजय मोहिमेतील अनुभव रोमांचक
स्वरूपानंद विद्यामंदिरमध्ये अनुभव कथन; निबंध, रस्सीखेच स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १९ः दोन महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे कोकण विजय सागरी नौकाभ्रमण मोहिमेतील कार्यक्रम स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरात झाला. या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. सागरी सफरीतील रोमांचक अनुभव, गावांमधील विविध कार्यक्रमांबाबतची माहिती त्यांनी सांगितली.
कमांडिंग ऑफिसर कमांडर रामांजुल दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात चंद्रालेख मोरया, उमेश केळकर, पुनम भरणकर, पावस सरपंच सौ. चेतना सामंत, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संतोष सामंत, स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरचे प्राचार्य बाबासाहेब माने आदी उपस्थित होते. रत्नागिरीत या मोहिमेची सुरुवात होऊन समुद्र किनारपट्टीवरील रनपार, पूर्णगड, आंबोळगड, धाऊलवल्ली, विजयदुर्ग ते पावस व रत्नागिरीत ही मोहीम पोहोचली. पावस येथील कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या या मोहिमेमधील प्रवासासंदर्भात अनुभव कथन केले.
याप्रसंगी एनसीसी कॅडेटच्या कोल्हापूर डिव्हिजनच्या माजी विद्यार्थी सुजाता पाटील यांनी आपले अनुभव या मोहिमेतील विद्यार्थ्यांना सांगितले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक केतन कदम, द्वितीय के. सी. श्रीवास, तृतीय विभागून दीक्षा गराटे व सोहम डोर्लेकर यांना देण्यात आले. रस्सीखेच स्पर्धेमध्ये मुलांच्या गट क्रमांक आठने प्रथम क्रमांक मिळवला, तर मुलींच्या गट क्रमांक सातने प्रथम क्रमांक मिळवला.
चौकट
विद्यार्थ्यांकडून कलागुणांचे सादरीकरण
छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केल्या. यामध्ये श्रावणी कुलकर्णी यांनी भरतनाट्यम् सादर केले. कुणाल मोरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या चाळीस दिवसांच्या कालखंडामध्ये झालेल्या छळासंदर्भात कथा सादर केली. एनसीसीच्या एका ग्रुपने महाभारतावर कथा सादर केली. मुलींच्या एका गटाने नृत्य केले. आर्य नाईक, समृद्धी देसाई, केतन कदम यांनी वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

