चिपळूण-कळबंस्तेत देवराईची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

चिपळूण-कळबंस्तेत देवराईची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

Published on

काही सुखद---लोगो

rat19p24.jpg-
05450
चिपळूण ः कळंबस्ते येथील देवराईची स्वच्छता करताना विद्यार्थी.
----------
कळबंस्तेत देवराईची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
श्रमदानात चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग; दोनशेहून अधिक प्रजातीची बहरणार दीड हजार झाडे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः शहरालगतच्या कळबंस्ते येथील शासनाच्या पडिक जागेत वनस्पती उद्यान आणि देवराईची हिरवळ वाढत आहे. देवराई अधिक सुशोभित होण्यासाठी येथे शहर परिसरातील विद्यार्थ्यांनी देवराईस भेट देत विविध वनस्पती व देवराईंच्या झाडांची माहिती घेतली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देवराईत अनावश्‍यक वाढलेले गवत व कचरा काढून बुधवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवले.
येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेत प्रशासकीय अधिकारी, विविध सेवाभावी संस्था, कंपन्या आणि सह्याद्री निसर्ग मित्रच्या माध्यमातून कळबंस्ते येथे देवराई आणि वनस्पती उद्यान विकसित केले आहे. सुमारे दोनशेहून अधिक प्रजातीची दीड हजार झाडे येथे लावण्यात आली आहेत.
पावसाळ्यात लावलेली ही झाडे चांगलीच वाढू लागली आहे. जी रोपे मृत पावली तेथे नव्याने त्याच जातीची रोपे पुन्हा लावण्यात आली. काही रोपे जिल्ह्यात न मिळाल्याने ती पुण्यातून आणली. विद्यार्थ्यांना या वनस्पतींच्या बोटॅनिकल बॅलची माहिती होण्यासाठी बुधवारी प्रांत कार्यालय व गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून डीबीजे महाविद्यालय, सती न्यू इंग्लिश स्कूल, आर. सी. कॉलेज ज्युनिअर कॉलेज पेढे, गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, ख्रिस्त ज्योती स्कूल, मेरी माता स्कूल खेर्डी या शाळेतील सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी भेट देऊन स्वच्छता अभियान उपक्रम राबविला.

चौकट
झाडांची निगा, परागीकरणाची माहिती
या विद्यार्थ्यांना वनस्पती उद्यान व देवराईबाबत तसेच झाडांची निगा, त्यांचे फायदे व आयुर्वेदिय उपयोग तसेच ग्रामीण भागांत वेगगवेगळ्या प्रजातींचे झाडांची निर्मिती करुन बोटॅनिकल गार्डन तयार करणे, मधमाशी/फुलपाखरू यांचे वसतिस्थान निर्माण करणे, पक्षांमार्फत १५ कि.मी. अंतरामध्ये फळझाडे, फुलझाडांवर होणार परागीकरण, जैवविविधतेचे जतन करणे, याबाबत उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी माहिती सांगून झाडांचे महत्त्व पटवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com