आरवली वेतोबाचा
उद्या जत्रोत्सव

आरवली वेतोबाचा उद्या जत्रोत्सव

Published on

आरवली वेतोबाचा
उद्या जत्रोत्सव
आरोंदा ः नवसाला पावणाऱ्या आरवली गावचे ग्रामदैवत देव वेतोबा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी (ता. २१) उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त केळी ठेवणे, नवस फेड, महाप्रसाद, पालखी, फटाक्यांची आतषबाजी, नाईक मोचेमाडकर दशावतार कंपनीचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २२) गुणीजनांचे सादरीकरण, त्यांचा गुणगौरव, तुळाभार आदी कार्यक्रम होतील. या जत्रोत्सवाला साधारणपणे तीन हजार केळ्यांच्या घडांची विक्री होत असते. आरवली देऊळवाडीतील जागृत देवस्थान देवी सातेरीची वार्षिक जत्रा शनिवारी (ता. २२) साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने केळी ठेवणे, ओटी भरणे, पालखी, नाईक मोचेमाडकर दशावतारी नाटक होणार आहेत.
......................
सतीश कदम यांची
अध्यक्षपदी निवड
कणकवली ः लोकशाही संघर्ष सेनेचे संस्थापक तथा नेते धनाजी सुकटे यांनी नुकतीच सतीश कदम यांची कोकण अध्यक्ष पदावर नियुक्ती केली. संघटनात्मक कार्यातील त्यांचा अनुभव, सामाजिक कार्यासाठी असणारी सकारात्मक दृष्टी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची असलेली तत्परता या सर्व बाबी लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. धनाजी सुकटे यांनी कदम यांना पत्राद्वारे शुभेच्छा देत, संघटनेची ध्येय-धोरणे आणि नियमांचे पालन करून सामाजिक कार्यासोबत योग्य सांगड घालण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या योगदानातून संघटनेची जनमानसातील विश्वासार्हता अधिक वाढेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
---
माजगाव विद्यालयात
संस्कृत संभाषण वर्ग
सावंतवाडी ः संस्कृत भारती कोकण प्रांत आणि वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा, सावंतवाडीद्वारे माजगाव भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात १९ ते २८ नोव्हेंबर दरम्यान संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन केले आहे. हा मोफत वर्ग असून सायंकाळी चार ते सहा या वेळेत वर्ग चालविले जाणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. वयोमर्यादा १५ वर्षे, वही नको, पेन नको, संस्कृतचे पूर्वज्ञान असण्याची गरज नाही. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
.......................
सातार्डा ग्रामपंचायत
‘सीसीटीव्ही’च्या नजरेत
सावंतवाडी ः सातार्डा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पंधराव्या वित्त आयोग निधीमधून चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात तसेच रस्ता वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने सातार्डा-मळेवाड व सातार्डा-सातोसे रस्त्यांच्या दिशेने हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक होण्यासाठी तसेच ग्रामस्थांना वस्तुस्थितीची माहिती मिळावी, म्हणून ग्रामपंचायत कार्यालय सीसीटीव्ही कॅमेराबद्ध केल्याचे सरपंच संदीप प्रभू यांनी सांगितले.
---
सावंतवाडी येथे
पुस्तक प्रदर्शन
सावंतवाडी ः येथील श्रीराम वाचन मंदिर येथे २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात नामवंत मराठी प्रकाशकांची दर्जेदार पुस्तके तसेच लहान मुलांसाठी आकर्षक सचित्र पुस्तके, भाषिक खेळ, व्यवसायमाला, शाब्दिक कोडी आदी विक्रीसाठी उपलब्ध असतील. सकाळी नऊ ते रात्री आठ दरम्यान या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन वाचनालयाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com