मालवणचा कायापालट करणार ः सावंत
05492
मालवणचा कायापालट
करणार ः सावंत
भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ
मालवण, ता. १९ : भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिजनरी नेतृत्व आहे, मुंबई, पुणेसारख्या शहरांचा त्यांनी कायापलट केला आहे. तसेच काम छोट्या शहारात होईल. मालवणचाही त्यात समावेश असेल, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन भाजपच्यावतीने मालवण पालिका निवडणुकीतील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत व सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ आज केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक पदाचे उमेदवार मंदार केणी, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, अमृता फाटक, पंकज सादये, सुवर्णा वालावलकर, रोहन पेंडुरकर, संतोषी कांदळकर, यतीन खोत, महानंदा खानोलकर, चंद्रशेखर कुशे, महिमा मयेकर, सौरभ ताम्हणकर, दीपाली वायंगणकर, संतोष शिरगावकर, मरीना फर्नांडीस, सन्मेष परब, अन्वेशा आचरेकर, रमेश हडकर, सेजल परब आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, ‘भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता नगराध्यक्ष पदासह सर्व २० ही जागा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. शिल्पा खोत या सर्व सामाजिक, धार्मिक क्षेत्रात अग्रणी आहेत. समाजातून त्यांच्यासह भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री राणे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नियोजनाची बैठक झाली. शेवटच्या टप्प्यात एखादी जाहीर सभा मालवणात घेणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात दोन सभा होतील, त्यातील एक सभा मालवणात घेण्यासाठी आम्ही प्रदेशाध्यक्ष यांना विनंती केली आहे. मालवण हे पर्यटन व ऐतिहासिक शहर आहे. हे अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करू.’ सौ. खोत म्हणाल्या, ‘मालवणचा विकास हे व्हिजन घेऊन निवडणूक लढवत आहोत. पुढील दोन ते तीन वर्षात मालवणचे सगळे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता विकासातूनच आम्ही यश दाखवून देणार आहोत.’ यावेळी विजय केनवडेकर, बाबा परब, विकी तोरसकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, रश्मी लुडबे उपस्थित होते.
---------------
05491
टीका न करता जनतेसमोर
जाणार ः वालावलकर
वेंगुर्लेत शिंदे शिवसेनेतर्फे प्रचार
वेंगुर्ले, ता. १९ ः राज्यात महायुतीचे सरकार आहे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. वेंगुर्लेत आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहोत. आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, असे प्रत्येक पक्षाला वाटते. यामुळे मित्रपक्षावर कोणतीही टीका न करता नम्रपणे जनतेसमोर जाणार आहोत, असे प्रतिपादन शिंदे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आज येथे केले.
येथील पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, देवी सातेरी, श्री स्वामी समर्थ मठ येथे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा समन्वयक वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे व २० नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शहरप्रमुख उमेश येरम, महिला शहरप्रमुख अॅड. श्रद्धा परब-बाविस्कर, सुहास कोळसुलकर, बबन नार्वेकर उपस्थित होते.
‘गेली पाच वर्षे मी नगरसेवक म्हणून अनेक विकासकामांसह समाजसेवा केली. माझे वडील नगरसेवक व उपनगराध्यक्ष होते. त्यांचा समाजसेवेचा वारसा व अनुभव माझ्या सोबत आहे. आता जनतेने संपूर्ण शहराची सेवा करण्याची संधी द्यावी. समाजसेवेचे माझे कार्य यापुढेही असेच सुरू ठेवून सचिन वालावलकर यांच्या साथीने शहराचा विकास निश्चित करू,’ असे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे यांनी सांगितले.
नगरसेवक पदाचे उमेदवार ः नगराध्यक्षपद उमेदवार-नागेश उर्फ पिंटू गावडे. नगरसेवक पदासाठी उमेदवार ः प्रभाग १ अ-लिना म्हापणकर, ब-आदित्य प्रभुखानोतकर, प्रभाग २ अ-तृप्ती माणगावकर, ब- सुरेंद्र चव्हाण, प्रभाग ३ अ-उमेश आरोलकर, ब-सुचिता परब, प्रभाग ४ अ-आरती बालावलकर, ब-बुधाजी पेरम, प्रभाग ५ अ- सान्वी गावडे, ब- सुनित दुबळे, प्रभाग ६ अ-रोहिणी लोणे, ब-शंकर गावडे, प्रभाग ७ अ-राशी कुबल, ब-बाळकृष्ण हुले, प्रभाग ८ अ-चित्रांजली केरकर, ब-दत्ताराम नार्वेकर, प्रभाग ९ अ-सुहास जाधव, ब-अॅड. श्रद्धा बाविस्कर, प्रभाग १० अ-मंजिरी मोरे, ब-प्रसाद बाविस्कर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

