पंढरपूर यात्रेमुळे 41 लाख 26 हजाराचे मिळाले उत्पन्न

पंढरपूर यात्रेमुळे 41 लाख 26 हजाराचे मिळाले उत्पन्न
Published on

पंढरपूर यात्रेमुळे ४१ लाख २६ हजारांचे उत्पन्न
राजापूर आगार; साडेआठ हजार वारकऱ्‍यांनी केला एसटी प्रवास
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० : कार्तिकी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनाला ये-जा करण्यासाठी राजापूर तालुक्यातील ८ हजार ७२१ वारकऱ्यांनी एसटीतून प्रवास केला. त्यातून राजापूर आगाराला ४१ लाख २६ हजार ९६७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी जय हरी विठ्ठलऽऽ च्या नामाचा जयघोष करत श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन झाले. त्यासोबत राजापूर एसटी आगाराला चांगले उत्पन्न मिळाले असून, खऱ्या अर्थाने विठ्ठल पावला आहे.
श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी एकादशीला पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये दरवर्षी राजापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने वारकरी जातात. त्याप्रमाणे यंदाही शीळ, उन्हाळे, कोदवली, ताम्हाणे, दोनिवडे, सौंदळ, ओझर, पडवे, तुळसवडे, आंगले, खरवते, पाचल, भालावली, गोवळ, वाटूळ आदी परिसरातील मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला गेले होते. त्यामध्येही काही वारकरी पायी दिंडीद्वारे पंढरपूर येथे गेले. काही वारकरी एसटीने पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. पंढरपूर येथे जाण्यासाठी राजापूर एसटी आगारातून वारकऱ्यांसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले होते. राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागासह जिल्हा आणि अन्य भागात नियमित धावणाऱ्‍या गाड्यांच्या फेऱ्यांचे योग्य नियोजन करताना आगार व्यवस्थापनानेही वारकऱ्यांसाठी प्रवासासाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. त्या द्वारे यावर्षी कार्तिक एकादशीनिमित्ताने ८ हजार ७२१ वारकऱ्‍यांनी एसटीतून प्रवास केला. त्यातून, राजापूर आगाराला ४१ लाख २६ हजार ९६७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकूण उत्पन्नामध्ये सवलतीमधून २३ लाख ६७ हजार ९१६ रुपये आणि विनासवलतीतून १७ लाख ५९ हजार ५१ रुपये उत्पन्न मिळाले. दरम्यान, अपुरी चालक-वाहकसंख्या, गाड्यांची कमतरता आणि खासगी प्रवासी वाहतुकीसोबत सातत्याने करावी लागणारी स्पर्धा आदी विविध समस्यांना एसटीला सामोरे जावे लागत आहे. त्यातून एसटी आगाराला आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीमध्ये कार्तिक एकादशीनिमित्ताने झालेल्या प्रवासातून मिळालेल्या लाखो रुपयांच्या उत्पन्नामुळे खऱ्या अर्थाने राजापूर एसटी आगाराला पांडुरंग पावला आहे.
---------
चौकट
दृष्टिक्षेपात
फेऱ्या* १४६
प्रवासी* ८ हजार ७२१
एकूण उत्पन्न* ४१ लाख २६ हजार ९६७ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com