पावस बाजारपेठेतील प्रवास होणार सुकर

पावस बाजारपेठेतील प्रवास होणार सुकर

Published on

- rat२०p१५.jpg-
२५O०५६२२
पावस ः येथील गोळपपूल ते पावस बाजारपेठमार्गे पावस बसस्थानक या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामाकरिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे.
---
पावस बाजारपेठेचा प्रवास होणार सुकर
रस्त्याचे काँक्रिटीकरण; स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २० ः रत्नागिरीहून पावस पर्यटनस्थळाकडे जाणारे पर्यटक अनेकवेळा गोळपपूल ते बाजारपेठ मार्गांचा वापर करतात. या रस्त्याची दूरवस्था झाल्यामुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता त्याचबरोबर नियमित प्रवास करणाऱ्यांनाही वाहने चालवताना कसरत करावी लागत होती; मात्र या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू केल्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.
अनेक वर्ष गोळपपूल ते बाजारपेठमार्गे पावस रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. हा मार्ग अरुंद असल्यामुळे पर्यायी मार्गही काढण्यात आला; परंतु तोही अरुंद असल्याने आणि दुतर्फा गटारे नसल्यामुळे तिथून प्रवास करणे अशक्य होत होते. दरवर्षी रस्त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. पावसाळा गेल्यानंतर खड्डे तात्पुरते बुजवण्यात आले; परंतु कायमस्वरूपी उपाययोजनेकडे दुर्लक्ष झाले. दर दोन वर्षांनी केलेले डांबरीकरण वाया जात होते. त्या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत होते. स्थानिक ग्रामस्थांनी या मार्गावरील खड्डे कायमस्वरूपी भरा किंवा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करा, अशी मागणी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करून देतो, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यानंतर तीन कोटीचा निधी मंजूर केला. या कामाचे उद्‍घाटन पंधरा दिवसांपूर्वी करण्यात आले. बाजारपेठ मार्गावरील प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन आणि पावसाळ्यापूर्वी कायमस्वरूपी उपाययोजना करता यावी याकरिता सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधला जात आहे. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या दूर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com