महायुतीसाठी शिवसेनेचे प्रयत्न प्रामाणिकच

महायुतीसाठी शिवसेनेचे प्रयत्न प्रामाणिकच

Published on

चिपळूण पालिका--लोगो

महायुतीसाठी शिवसेनेचे प्रयत्न प्रामाणिकच
सदानंद चव्हाण : शून्यातून उभे राहणे हे नवे नाही
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः नगरपालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी महायुतीतील सर्व पक्षांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता महायुती टिकणार की, तुटणार या विषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाला याबद्दल काय वाटतंय, याची दखल घेण्याची गरज वाटत नाही. कारण, महायुतीसाठी शिवसेनेचे प्रयत्न प्रामाणिकच होते आणि आहेत, अशी भूमिका शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी स्पष्ट केली.
सदानंद चव्हाण म्हणाले, केंद्र, राज्याप्रमाणे इथेही महायुतीने निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. लोकसभेत भाजपला प्रतिनिधित्व मिळाले, विधानसभेत राष्ट्रवादीला प्रतिनिधित्व दिले गेले. या न्यायाने नगरपालिकेत शिवसेनेला नगराध्यक्षपदाची संधी मिळावी, ही आमची स्वाभाविक भावना होती. विद्यमान नगराध्यक्ष आपला स्वतःच्या पक्षाचा असताना देखील भाजपने शिवसेनेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यास सहमती दर्शवली; मात्र राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदाची मागणी कायम ठेवली. इतकेच नव्हे, तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद कापडी यांनी राष्ट्रवादी नगराध्यक्षपदासह २७ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर करून टाकले. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा?
जागावाटपात शिवसेना-भाजपत कुठेही अडचण नव्हती तर शिवसेना-राष्ट्रवादीतही कुठे अडचण नव्हती. एक-दोन जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. असे असताना राष्ट्रवादीने अचानक प्रभाग क्र. ११ मधून किशोर रेडीज यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. दुसरीकडे प्रभाग क्र. ७ मध्ये शिवसेनेच्या निश्चित झालेल्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला. हा प्रकार न समजण्यासारखाच होता. पालकमंत्री सामंत महायुतीसाठी कालही अनुकूल होते आणि आजही आहेत. महायुतीसाठी शिवसेना कालही आग्रही होती आणि आजही आहे; मात्र दुर्दैवाने, महायुती न झाल्यास त्याचा दोष शिवसेनेला देणे योग्य होणार नाही, असे बजावताना शून्यातून उभे राहणे शिवसेनेला नवीन नाही, असेही सदानंद चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com