

निवडणुक पानासाठी
प्रभागाचे अंतरंग भाग -८
swt२०२४.jpg
05702
सुरेंद्र बांदेकर
टीपः swt२०२५.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - प्रतीक बांदेकर
टीपः swt२०२६.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - अनारोजीन लोबो
टीपः swt२०२७.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - सुकन्या टोपले
टीपः swt२०२८.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - शिप्रा सावंत
टीपः swt२०२९.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - सुमेधा सावंत
टीपः swt२०३०.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - संदीप वेंगुर्लेकर
टीपः swt२०३१.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - रंजना निर्मल
प्रभाग आठमध्ये दिसणार मोठी चुरस
नवे-जुने चेहरे रिंगणात ः सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी
रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये दोन नगरसेवक आणि एक माजी नगराध्यक्षा आपले नशीब आजमावत असून या प्रतीक बांदेकर व सुरेंद्र बांदेकर हे काका पुतणे आमने-सामने आले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी एक असे उमेदवार या प्रभागांमध्ये उभे केले आहेत तर भाजप, शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेनेने या ठिकाणी पुर्ण ताकदीने आपले दोन्ही उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. या प्रभागामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
येथील पालिकेचा प्रभाग आठ हा नेहमी आमदार दीपक केसरकर यांच्या सोबत राहिला आहे. त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राहिलेल्या अनारोजीन लोबो व सुरेंद्र बांदेकर हे विद्यमान नगरसेवक आहेत. पुन्हा एकदा या दोघांनी या ठिकाणी जनतेच्या पाठिंबावर रणांगणात उडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार की नवीन चेहऱ्यांना संधी देणार हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. या ठिकाणी भाजपने सुकन्या टोपले व प्रतिक बांदेकर यांना रिंगणात उतरवले आहे. बांदेकर हे केसरकरांचे समर्थक होते. परंतु, अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत या ठिकाणची उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे या ठिकाणी काका आणि पुतणे समोर येणार आहेत.
दुसरीकडे ठाकरे शिवसेनेकडून माजी नगरसेविका राहिलेल्या आणि २०११ मध्ये सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आलेल्या शिप्रा सावंत यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्याबरोबर राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू राहिलेले व कबड्डीचे राजकीय पंच म्हणून राज्यात ओळख असलेले संदीप वेंगुर्लेकर यांना रिंगणात उतरले आहे. राष्ट्रवादीकडून निवृत्त कृषी अधिकारी असलेल्या व राष्ट्रवादीच्या शहर महिला अध्यक्ष असलेल्या रंजना निर्मल व काँग्रेसकडून भाईसाहेब सावंत यांची भाची व (कै.) विकास सावंत यांची आते बहिण असलेल्या सुमेधा सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. एकूणच या प्रभागातील सर्व उमेदवारांची चाचपणी पाहता या ठिकाणी निवडणूक रंगतदार होणार आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना या ठिकाणी पूर्ण ताकतीने जोर लावणार आहे, तर ठाकरेकडूनही या ठिकाणी फाईट देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच मतांची होणारी विभागणी ज्याच्या पथ्यावर पडणार तेच या ठिकाणी विजयी उमेदवार ठरणार आहेत. त्यामुळे जनता माजी नगरसेवक असलेल्यांना की नवीन चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
-----------
चौकट
प्रभागाची रचना
प्रभाग आठची रचना लक्षात घेता, यावेळी बदललेल्या रचनेमधून निंबाळकर पीर, चॅपेल गल्ली व होळीचा खुंट हा भाग वगळण्यात आला आहे. नवीन रचनेमध्ये रवी बांदेकर केंद्र उजवी बाजू ,पंडित वकील घर उजवी बाजू ,राजा स्वार दुकान, करोल बिल्डिंग, कंटक पणन एसपीके कॉलेज उजवी बाजू, तीन मुशी, गार्डन मागची बाजू, मिलाग्रीस हायस्कूल, परीट पाणंद, संजीवनी हॉस्पिटल, फॉरेस्ट ऑफिस, जुना शिरोडा नाका अशी आहे. येथील एकूण मतदार हे १७९० इतके आहेत. जवळपास ११०० एवढे मतदान होण्याची शक्यता आहे.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.