स्मार्ट मीटरसाठी बांद्यात सक्ती

स्मार्ट मीटरसाठी बांद्यात सक्ती

Published on

05781

स्मार्ट मीटरसाठी बांद्यात सक्ती

गुरुदास गवंडेंचा आरोप; कारभार सुधारण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ ः परिसरातील गावांमध्ये स्मार्ट मीटर बसविणे विरोधात ग्रामसभेचा ठराव झालेला असतानाही सहाय्यक अभियंता ग्राहकांनी सक्ती करीत आहेत. जीर्ण वीज वाहिन्या व पोल, निकृष्ट व बेभरवशाची सेवा अशा विविध तक्रारी असतानाही स्मार्ट मीटरची सक्ती सहन करणार नाही. आधी कारभार सुधारा; अन्यथा ग्रामस्थांसमवेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा सावंतवाडी सरपंच सेवा संघटना माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी महावितरण कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
श्री. गवंडे यांनी निवेदनातून महावितरणच्या कारभारावर टीका केली आहे. त्यात नमूद केले आहे की, बांदा परिसरातील निगुडे, कास ग्रामपंचायतीने गावात स्मार्ट मीटर बसवणे विरोधात ग्रामसभेत ठराव संमत केला आहे. असे असतानाही सहाय्यक अभियंता गावात स्मार्ट मीटर बसवण्याबाबत सक्ती करत आहेत. मडुरे येथे ११ केव्ही लाईन टाकण्याचे काम अत्यंत निकृष्टपणे करण्यात आले आहे. रस्त्याच्या एका दिशेने लाईन नेणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र, ठिकठिकाणी रस्त्यावरून क्रॉसिंग लाईन नेल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या कामावर महावितरणच्या अधिकाऱ्यांची पाहणी नसल्यामुळे ठेकेदार मनमानीपणे काम करीत आहेत. या कामाची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी. तालुक्यात ठिकठिकाणी वीज वाहिन्या व वीजेचे खांब जीर्ण झालेले आहे. ते बदलण्याची यापूर्वीच वारंवार मागणी केली गेली आहे. मात्र, महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आधी आपला कारभार सुधारा; अन्यथा वीज ग्राहकांसमवेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. लवकरच मडुरे येथील कामाची पाहणी करणार, असे आश्वासन अभियंता वनमोरे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com