धावण्याच्या स्पर्धेत झियाद शेख प्रथम
05782
धावण्याच्या स्पर्धेत
झियाद शेख प्रथम
सावंतवाडी ः स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित एक किलोमीटर धावण्याच्या क्रीडा प्रकारात १२ वर्षांखालील मुलांच्या गटात सि. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचा विद्यार्थी झियाद शेख याने उत्तुंग कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. आयोजकांतर्फे प्रशस्तिपत्र, मेडल आणि चषक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---
05808
पाडलोस येथे
२६ ला जत्रा
बांदा ः पाडलोसचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता.२६) होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांसाठी दिवसभर विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जत्रोत्सवानिमित्त सकाळी देवतांवर महाआभिषेक, समाराधना, ओटी भरणे, केळी ठेवणे तसेच नवस बोलणे व फेडणे या धार्मिक सेवा होणार आहेत. रात्री श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री एकला आजगावकर दशावतार नाट्यमंडळचा महान पौराणिक नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन पाडलोसवासीयांनी केले आहे.
---
05791
कवठणी येथे
२८ ला जत्रा
आरोंदा ः कवठणी (ता.सावंतवाडी) येथील श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी (ता.२८) होणार आहे. या दिवशी मंदिरात सकाळी देवीची विधिवत धार्मिक पूजा, त्यानंतर केळी ठेवणे, ओटी भरणे, गाऱ्हाणे, नवस बोलणे-फेडणे तसेच रात्री पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. पहाटेच्या प्रहरी दहीकाला, देवीची आरती होणार असून या जत्रौत्सवाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कवठणीतील ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

