चिपळूण ः शेती सोडून नोकरीच्या मागे धावू नका

चिपळूण ः शेती सोडून नोकरीच्या मागे धावू नका

Published on

ratchl211.jpg-
05849
चिपळूण ः मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. तानाजीराव चोरगे.
--------
शेती सोडून नोकरीच्या मागे धावू नका
डॉ. तानाजीराव चोरगेः चिपळुणात सहकार सप्ताह साजरा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ः कोकणातील तरुणांनी आता मुंबई-पुण्याच्या नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या गावातील शेतीत लक्ष घालण्याची गरज आहे. हिंमत हरलेला योद्धा कधीच युद्ध जिंकू शकत नाही त्यामुळे जिद्दीने शेती करा आणि सहकाराच्या माध्यमातून गावविकास साधा, असे मत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी येथे केले.
चिपळुणात ७२व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्ड आणि कृषीभूषण डॉ. तानाजीराव कृषी महाविद्यालय यांच्यावतीने घेण्यात आला. डॉ. चोरगे म्हणाले, केवळ नेत्यांच्या मागे फिरून किंवा फुकट मिळणाऱ्या योजनांवर अवलंबून राहून पोट भरणार नाही. कितीही प्रगती झाली तरी भात आणि गहू हे कारखान्यात तयार होत नाहीत, ते शेतातच पिकवावे लागतात. कष्ट करायची तयारी ठेवा. मुंबईत १०-१२ हजारांची नोकरी करण्यापेक्षा गावात राहून शेती आणि पूरक व्यवसाय करा, जिथे शुद्ध हवा, स्वतःचे घर आणि स्वाभिमान आहे. सहकारी संस्थांच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी केरळमधील सहकारी संस्थांचे उदाहरण दिले.
कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हेमंत वणजू, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर, अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि जिल्हा उपायुक्त (पर्यटन व दुग्ध व्यवसाय) डॉ. दत्तात्रय सोनावले उपस्थित होते. मेळाव्यात सुमारे २५०हून अधिक विविध कार्यकारी सोसायट्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com