राजापूरमध्ये अनुभवींसह नव्या चेहर्‍यांनाही संधी

राजापूरमध्ये अनुभवींसह नव्या चेहर्‍यांनाही संधी

Published on

सरकारनामा

राजापूरमध्ये अनुभवींसह नव्या चेहऱ्यांनाही संधी
अपक्षांमुळे चुरस वाढली ; प्रभाग १ व २ मध्ये तिरंगी लढत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ः राजापूर शहरातील प्रभाग १ आणि २ मध्ये अपक्षांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत निश्चित झाली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कसून काम करावे लागणार आहे. या दोन्ही प्रभागात युती व आघाडीकडून अनुभवी उमेदवारांसह नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.
राजापूर शहरातील प्रभाग क्र. १ च्या उत्तरेकडे तिठवली व हर्डी गावची सीमा, पूर्वेकडे हर्डी गावची सीमा, गोडे नदीपात्राचा भाग, दक्षिणेकडे धोपेश्‍वर गावची हद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यापासून ते साखरकर घराजवळील पायवाट व त्यापुढे मालपेकर घरापर्यंत पायवाटेचा भाग तर पश्‍चिमेकडे धोपेश्‍वर तिठवली व हर्डी गावची हद्द असा विस्तारलेला आहे. १ हजार ७ लोकसंख्या आणि ४३८ पुरुष, ४६२ महिला असे ९०० मतदार आहेत. प्रभाग क्र. २ चा कोदवली गाव सीमेलगतची वहाळी असा उत्तरेकडे तर, पूर्वेकडे गुरववाडी स्मशानलगतचे वहाळीचे बिंदूपासून कोर्ट पाणंद आचार्य कुळकर्णी मार्गाला मिळते. बिंदुपर्यंत, दक्षिणेकडे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या मागील बाजूपासून पुढे परीट घाटी, कन्याशाळापर्यंत व पुढे लंबू कब्रस्तान, तर पश्‍चिमेकडे कोदवली गावच्या सीमेलगतच्या वहाणीच्या नदीच्या ठिकाणापासून पुढे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या मागील बाजूपर्यंत गोडे नदीपात्राचा भाग असा विस्तारलेला आहे. ९७६ लोकसंख्या आणि ३६२ पुरुष, ३९३ महिला असे ७५५ मतदार आहेत. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या प्रभागांमध्ये रस्ते, पाणी यांसह अन्य प्रमुख विकासकामे आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडी असो वा महायुती दोघांचेही राजकीयदृष्ट्या वर्चस्व असल्याने नेमकी बाजी कोण मारणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com