प्रभाग तीन, नऊमध्ये तिरंगी; इतरत्र दुरंगी लढत
प्रभाग तीन, नऊमध्ये तिरंगी; इतरत्र दुरंगी लढत
कणकवलीत चित्र स्पष्ट; १४ उमेदवारांची निवडणुकीतून माघार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २१ : कणकवली नगरपंचायतीमध्ये आज एकूण १४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे मागे घेतली. यामुळे प्रभाग तीन आणि नऊचा अपवाद वगळता इतर प्रभागांत दुरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर कणकवली नगरपंचायतीमधील स्पष्ट झालेले चित्र असे ः प्रभाग एक - राकेश राणे (भाजप) आणि तेजस राणे (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग दोन - प्रतीक्षा सावंत (भाजप) आणि साक्षी आमडोसकर (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग तीन - स्वप्नील राणे (भाजप), सुमीत राणे (क्रांतिकारी विचार पक्ष), संजय पवार (आम आदमी). प्रभाग चार - माधवी महेंद्र मुरकर (भाजप), जाई निकित मुरकर (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग पाच - मेघा अजय गांगण (भाजप), स्नेहा नीलेश वाळके (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग सहा - स्नेहा महेंद्र अंधारी (भाजप), सुमेधा सखाराम अंधारी (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग सात - सुप्रिया समीर नलावडे (भाजप), सावी दत्तात्रय अंधारी (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग ८ मधून गौतम शरद खुडकर (भाजप), लुकेश गोविंद कांबळे (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग नऊ - मेघा महेश सावंत (भाजप), रिना रविकांत जोगळे (क्रांतिकारी विचार पक्ष) आणि मधुरा चंद्रकांत मालंडकर (अपक्ष). प्रभाग दहा- आर्या औदुंबर राणे (भाजप), शीतल रामदास माजरेकर (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग ११ - मयुरी महेंद्र चव्हाण (भाजप), दीपिका प्रदीपकुमार जाधव (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग १२ - मनस्वी मिथून ठाणेकर (भाजप), प्रांजली प्रदीप आरोलकर (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग १३ - गणेश उर्फ बंडू सोनू हर्णे (भाजप), जयेश विजय धुमाळे (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग १४ - सुरेंद्र उर्फ अण्णा सुधाकर कोदे (भाजप), राधाकृष्ण उर्फ रुपेश चंद्रकांत नार्वेकर (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग १५ - विश्वजित विजय रासम (भाजप), संकेत श्रीधर नाईक (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग १६ - संजय मधुकर कामतेकर (भाजप), उमेश सहदेव वाळके (क्रांतिकारी विचार पक्ष). प्रभाग १७ - अबिद अब्दूल नाईक (राष्ट्रवादी), सुशांत श्रीधर नाईक (क्रांतिकारी विचार पक्ष).
------------
नगराध्यक्ष रिंगणातून पारकरांची माघार
नगराध्यक्ष निवडणुकीत सौरभ संदेश पारकर (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे समीर नलावडे, क्रांतिकारी विचार पक्षातर्फे संदेश पारकर आणि लोकराज्य जनता पार्टीतर्फे गणेशप्रसाद पारकर हे निवडणूक रिंगणात आहेत.
---
नगरसेवक रिंगणातून माघार घेतलेले
राजेश राणे (प्रभाग १), रोहिणी पिळणकर (प्रभाग २), शिवम राणे (प्रभाग ३), श्रेया पारकर (प्रभाग ४), सोनाली कसालकर (प्रभाग ७), किशोर कांबळे अाणि विठ्ठल कासले (प्रभाग ८), साक्षी नेरकर (प्रभाग १२), सुप्रिया नाईक आणि प्राजक्त आळवे (प्रभाग १५), हिरेन कामतेकर आणि सोहम वाळके (प्रभाग १६) आणि मयुरी नाईक (प्रभाग १७).

