खेड-शौर्याचे प्रतिक अनास्थेमुळे धुळखात
rat21p18.jpg-
05847
खेडः येथील मिग विमानाची दूरवस्था.
----------
खेडमधील मिग लढाऊ विमानाची दुरवस्था
शिवतरच्या सैनिकी परंपरेचा अवमान; पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ : शिवतर गावच्या गौरवशाली सैनिकी परंपरेचे प्रतीक असलेल्या मिग लढाऊ विमानाच्या स्मारकाची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली आहे. सात वर्षांपूर्वी संरक्षण विभागाने खेड नगरपालिकेला अत्यंत मानाने सुपूर्द केलेले हे खरेखुरे मिग विमान आजही पूर्ण स्मारकाच्या स्वरूपात उभे राहू शकले नाही, ही लाजिरवाणी बाब म्हणून समोर येत आहे.
२०१८ मध्ये जागतिक इतिहासात नोंद असलेल्या शिवतर गावातील माजी सैनिकांनी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या माध्यमातून या विमानाची मागणी केली होती. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शिवतरसारख्या छोट्या गावातून तब्बल २३४ जवानांनी रणांगणात सहभाग घेतला. अनेकांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या स्मृतीचा सन्मान राखण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हे मिग विमान खेड पालिकेकडे सोपवण्यात आले. संरक्षण विभागाने स्मारक उभारणीसाठी आवश्यक सर्व मार्गदर्शक सूचना देत विमान अधिकृतरित्या पालिकेला प्रदान केले.
खेड पालिकेने ३८ लाखाचा निधी मंजूर करून चौथरा बांधून विमान उभारले; परंतु त्यानंतरचे कोणतेही काम पूर्ण करण्याची पालिकेची इच्छाशक्ती संपल्यासारखी दिसते. संरक्षणात्मक शेड, माहितीफलक, प्रकाशयोजना, परिसर सौंदर्यीकरण, सुरक्षाव्यवस्था या सर्व कामांपैकी एकही काम सात वर्षांत पूर्णत्वास गेले नाही. ८० टक्के काम आजही जैसे थे आहे. प्रबोधनकार ठाकरे उद्यानातील ओसाड, उजाड झालेल्या बागेत हे विमान आज उघड्यावर, धुळीत माखलेले आणि अक्षरशः बेवारस अवस्थेत पडून आहे. उद्यानातील वाईट अवस्थेमुळे अनेकांना हे विमान खरे की, खेळण्यातील मॉडेल असा संशय निर्माण होतो; परंतु हे विमान दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष वापरलेले, संरक्षण विभागातून विधीवत मिळालेले खरी मिग यंत्रणा असल्याचे दस्तऐवज सांगतात. शहीद जवानांच्या स्मृतीचा एवढा मोठा अवमान होत असल्याने ग्रामस्थ आणि माजी सैनिकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून, त्यांनी नगरपालिकेवर कठोर कारवाईची मागणी जोरात केली आहे.
कोट
मिग विमानाच्या प्रतिकृतीचे काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते; परंतु तसे झालेले नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे.
- अॅड. सैफ चौगुले, खेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

