चिंदर भगवंतगडावर शिवप्रेमींतर्फे स्वच्छता
05992
चिंदर भगवंतगडावर शिवप्रेमींतर्फे स्वच्छता
आचरा ः जागतिक वारसा सप्ताहनिमित्त गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे सदस्य व शिवप्रेमींनी चिंदर येथील किल्ले भगवंतगडावर स्वच्छता मोहीम राबवत एक अभिनव उपक्रम राबवला. लोकांना सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे महत्त्व समजणे, त्यांचे संरक्षण करणे तसेच भावी पिढ्यांसाठी हा वारसा जतन करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष वरद जोशी यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेत प्रथमेश चव्हाण, सोहम घाडीगावकर, राजन पालकर, स्वप्नील शिर्सेकर, आकाश मेस्त्री, नारायण पाताडे सहभागी झाले.
..................
05993
मळेवाड परिसरात माकडांचा उच्छाद
आरोंदा ः मळेवाड पंचक्रोशीत सध्या जंगली प्राणी तसेच माकडांनी धुमाकुळ घातला असून बागायतींसह घरांवरील कौले, पत्रे फोडून नुकसान करत आहेत. गेले काही महिने जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. या प्राण्यांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या माकडांच्या सततच्या वावरामुळे येथील नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांना आपला जीव गमावला लागत आहे. शेकरू जातीचा प्राणी, गव्यांचा कळप बागायतचीचे नुकसान करत आहेत. अलीकडे गावात माकडांची संख्या वाढली असून याबाबत वनखात्याने योग्य ती उपाययोजना करून माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

