सरकारनामासाठी

सरकारनामासाठी

Published on

फ्लॅश बॅक--------लोगो

दीशेड वर्षांची रत्नागिरी नगरपालिका........भाग २

...आणि लोकनियुक्त प्रतिनिधींचा
कारभार सुरू झाला

बॉम्बे डिस्ट्रिक म्युन्सिपल अॅक्ट १९०१ अन्वये रत्नागिरी नगरपालिकेची प्रथमच लोकनियुक्त सभासदांची तरतूद करण्यात आली आणि सरकारी अधिकारी सभासदांची संख्या एकूण सभासद संख्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक असू नये, असं ठरवण्यात आले. नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्याचे अधिकारही पालिकेला देण्यात आले. बॉम्बे ब्युरो अॅक्ट १९२५ अन्वये रत्नागिरी नगरपालिकेला म्युनिसिपल ब्युरोचा दर्जा देण्यात आला. पालिकेला व चीफ ऑफिसर अर्थात् मुख्याधिकारी यांना काही मर्यादेपर्यंत निर्णय अधिकार देण्यात आले आणि नगरपालिकेत लोकांचा समावेश असलेला कारभार सुरू झाला. रत्नागिरी पालिकेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान ल. वि. परुळेकर यांना मिळाला.

- राजेश शेळके, रत्नागिरी
---
पुढे काही वर्षे मतदार संघातून २९ सभासद पालिकेत कार्यरत होते, त्यापैकी २७ हे निवडून देण्याची तरतूद होती. मुंबई सरकार हेल्थ अँड लोकल गव्हन्र्मेंट डिपार्टमेंटने पालिकेच्या घटनेत बदल केला. त्या वेळी एकूण २५ सदस्यांपैकी मुस्लिम दोन, दलित एक अशा तीन जागा राखीव ठेवण्यात आल्या. पुढे शासनाने १९९१च्या ठरावानुसार, पालिकेची पुनर्रचना करून एकूण २५ पैकी स्त्रियांसाठी तीन, मागासवर्गियांसाठी एक जागा राखीव ठेवण्यात आली. महाराष्ट्र राज्यस्थापनेनंतर शहरातील २३ प्रभागातून प्रत्येकी एक सभासद निवडण्यात आले. दोन जागा स्त्रियांसाठी राखीव, दोन जागा स्वीकृत सभासदांसाठी ठेवण्यात आले. या पुनर्रचनेमुळे प्रथमच पॅनलऐवजी एक सदस्य मतदार संघाची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी म्हणजेच २१ मे १९५६ रोजी पालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने पालिकेचा कारभार ३० डिसेंबर १९५७ पर्यंत सरकारी प्रशासक पाहत होता.
१९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर १९५६चा पालिका अधिनियम कायदा अंमलात आला. त्यामुळे ब वर्ग नगरपालिका असा दर्जा मिळाला. १९७२ मध्ये २३ प्रभागांचे २५ प्रभाग झाले. १९७४ मध्ये सदस्य ३२, स्त्रिया आणि स्वीकृत नगरसेवकांसाठी प्रत्येकी ३ जागा राखीव झाल्या. १९७४ मध्ये प्रथमच थेट नगराध्यक्ष निवडणूक झाली आणि रत्नागिरीचे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ज. शं. केळकर हे पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. १९८१ पर्यंत त्यांचा कारभार होता. त्यांच्या कारभारानंतर पुन्हा ५ वर्ष प्रशासकीय राजवट झाली. १९८५ मध्ये निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये अनंत शेठ जाधव हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर शिंदे, रवींद्र सुर्वे यांची नगराध्यक्षपदाची कारकीर्द आजही अनेकांना लक्षात आहे. १९९६ पासून नगराध्यक्षपदांचा कार्यकाल एक वर्षाचा झाला. त्यामध्ये प्रथम उमेश शेट्ये नंतर राजन साळवी हे त्या काळचे तरुण कार्यकर्ते रत्नागिरीचे नगराध्यक्ष म्हणून लाभले. नंतर अडीच वर्षाच्या कालावधीसाठी प्रमोद रेडीज यांनी कार्यभार पाहिला. २००१ मध्ये पुन्हा थेट निवडणूक झाली आणि उमेश शेट्ये निवडून आले. परत निवडणूक पद्धत बदलली आणि पुन्हा सदस्यांमधून नगराध्यक्ष ठरवले जाऊ लागले. त्यामध्ये मधुकर घोसाळे, अशोक मयेकर, मिलिंद कीर, राजेश्वरी शेट्ये, महेंद्र मयेकर, राहुल पंडित, प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान राजेश्वरी शेट्ये यांना मिळाला तर पुन्हा २०१६ मध्ये थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि राहुल पंडित निवडून आले होते. या काळात प्रभागरचनेतही वारंवार बदल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com