राष्ट्रवादी कॉंग्रेस ठरवणार विजयाचे गणित
-rat२२p१९.jpg-
२५O०६०३६
चिपळूण पालिका
------
चिपळूण पालिका वार्तापत्र---लोगो
राष्ट्रवादी काँग्रेस ठरवणार विजयाचे गणित
भाजप-शिंदेसेना युती ; भास्कर जाधव अन् रमेश कदम यांची दिलजमाई
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण ः चिपळूण पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला बाजूला करत शिंदेसेना आणि भाजपने युती केली. महाविकास आघाडीत तिन्ही घटक पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने त्रांगडे आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेत स्वबळावर निवडणुकीस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. या वेळी आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांची दिलजमाई झाली. एकेकाळचे कट्टरविरोधक हातात हात घालून काम करत आहेत. जाधव-कदमांची ही जोडी पालिकेच्या निवडणुकीत कोणा कोणाला पाणी पाजणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
--नागेश पाटील, चिपळूण
----
चिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरुवातीला महायुती तसेच महाविकास आघाडीचे गणित समोर ठेवून चर्चा, बैठका सुरू होत्या. नगराध्यक्षपदावरून घोडे अडत गेले. महायुतीतील राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना नगराध्यक्षपदावर ठाम होती; मात्र राष्ट्रवादीकडून महायुतीत राहण्याचे सुरुवातीपासून सांगितले जात होते; मात्र राष्ट्रवादीला बाजूला करत शिंदेसेना आणि भाजपने युती करत राष्ट्रवादीला दूर ठेवणे पसंत केले. भाजपने १२ आणि शिंदेसेनेला १६ जागांवर उमेदवारी असून, शिंदेसेनेचे उमेश सकपाळ नगराध्यक्षपदासाठी लढत आहेत; मात्र राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले मिलिंद कापडी यांनी माघार घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाने नगरसेवकपदासाठी १५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्या व्यतिरिक्त नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कोणाला सहकार्य करणार, यावर सारी गणिते अवलंबून आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्यासाठी संबंधित नेतेमंडळी आमदार शेखर निकम यांना गळ घालू लागल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे ठाकरे सेनेत पालिका निवडणुकीत दोन गट झाले आहेत. आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांची दिलजमाई झाली. शिवसेनेत आमदार जाधव गटाला १२ आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला १६ जागा सोडल्या आहेत. माजी आमदार कदमांच्या पाठी आमदार जाधवांची ताकद लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्येही बंडाळी झाली. तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांना शह देत नगराध्यक्षपदासाठी सुधीर शिंदे यांना बळ दिले. अखेर शाह यांनी अपक्ष म्हणून लढण्यास सुरुवात केलेली आहे. एकूण पालिकेच्या निवडणुकीत दिवसागणिक राजकीय गणिते बदलत आहेत. पुढील १० दिवसांत उमेदवारांचे चारित्र्य, वाढलेले वय, जातीचे वलय, पक्षाची निष्ठा आदी मुद्दे गाजणार असल्याचे संकेत राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
चौकट
नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार
* रमेश कदम- राष्ट्रवादी शरद पवार पक्ष
* उमेश सकपाळ- शिवसेना-भाजप युती
* राजू देवळेकर- शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष
* सुधीर शिंदे- काँग्रेस
* निशिकांत भोजने- अपक्ष
* लियाकत शहा- अपक्ष
* मोईन पेचकर- समाजवादी पक्ष
चौकट
रिंगणातील पक्षनिहाय उमेदवार
नाव* नगरसेवक* नगराध्यक्ष
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष* १४* १
शिवसेना (उद्धव ठाकरे)* २१* १
राष्ट्रीय काँग्रेस* १३* १
राष्ट्रवादी अजित पवार पक्ष* १५* -
शिवसेना (शिंदेगट)* १७* १
भाजप* ११* -
अपक्ष* १८* २
समाजवादी पार्टी* १* १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

