भगवान सत्य साईबाबा जन्मशताब्दी
वर्षानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम

भगवान सत्य साईबाबा जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम

Published on

भगवान सत्य साईबाबा
जन्मशताब्दी कार्यक्रम
रत्नागिरीः भगवान श्री सत्य साईबाबा जन्मशताब्दी वर्षाची सुरवात रविवारपासून (ता. २३) होत आहे. येथील श्री सत्यसाई सेवा समिती या निमित्ताने विविध उपक्रम हाती घेत आहे. भगवान श्री सत्यसाईबाबांनी भारतामध्ये खूप ठिकाणी विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच मूल्याधारित शिक्षणासाठी प्रसिद्ध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. मोफत पेयजल योजना चालू केल्या. भक्ती, ज्ञान व कर्म या विषयी त्यांनी अमूल्य विचार विश्वासमोर ठेवले. शताब्दी वर्षामध्ये जगभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. रत्नागिरी समितीतर्फे आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचा समावेश आहे. सामाजिक कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री सत्यसाई भजन स्पर्धा, सुगम गायन स्पर्धा, बुद्धिमत्ता चाचणी स्पर्धा, काही खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक मदत दिली जाणार आहे. नारायणसेवा दर महिन्याला केली जाणार आहे.
------
rat22p20.jpg
06037
रत्नागिरी : जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश मिळवणारा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा चमू.

‘गोगटे’च्या विद्यार्थ्यांचे
युवा महोत्सवात यश
रत्नागिरी ः क्रीडा मंत्रालय आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय महोत्सव जिल्हा क्रीडासंकूल येथे झाला. महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. लोकनृत्य स्पर्धेत लोकगीत ग्रुप प्रथम, चित्रकला स्पर्धेत प्राप्ती आलीम प्रथम, वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी शिंदे द्वितीय आणि तन्वी सावंतने तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान प्रदर्शन प्रथम आणि तृतीय क्रमांक गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाने पटकावला. विभागीय स्तरासाठी सांगली येथे स्पर्धा होणार आहेत. प्रा. वेदांग सौंदलगेकर, प्रा. हरेश केळकर, प्रा. कश्मिरा सावंत, प्रा. बाबा सुतार, प्रा. शुभम पांचाळ, ओंकार बंडबे आदींनी मार्गदर्शन केले.
-----------

rat22p7.jpg-
05982
सावर्डे : असुर्डे निर्मळवाडी ते सुकाई देवी मंदिर रस्त्याच्या भूमीपूजनप्रसंगी आमदार शेखर निकम, रोहन बने, संजय कदम व इतर ग्रामस्थ.


सुकाई देवी मंदिर
रस्त्याचे भूमिपूजन
सावर्डे ः चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथे निर्मळवाडी ते सुकाई देवी मंदिर रस्त्याचे भूमीपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. आमदार निकम यांनी विविध विकासफंडातून दोन किलोमीटर लांबीच्या दुर्गम रस्त्यासाठी अंदाजे साठ लाख रुपये निधी मंजूर केला. या निधीतून लवकरच दर्जेदार रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे, असे सांगितले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, कोकरे जिल्हा परिषद गट अध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष सुधीर राजे, कोकरे पंचायत समिती गण अध्यक्ष नागेश साळवे, उपाध्यक्ष नीलेश खापरे, सरपंच पंकज साळवे, उपसरपंच दिलीप जाधव, निर्मळवाडी ग्रामस्थ अनंत निर्मळ, यशवंत निर्मळ आदी उपस्थित होते.
------------------
खाद्य महोत्सव
सावर्डे येथे साजरा
सावर्डे ः फलाहे दारैन सोसायटी चिपळूण संचलित अली पब्लिक स्कूल सावर्डे येथे खाद्य महोत्सव उपक्रम साजरा करण्यात आला. उपक्रमाचे उद्घाटन सावर्डे सरपंच समिक्षा बागवे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपसरपंच जमीर मुल्लाजी, ग्रामपंचायत सदस्य समिया मोडक, मैनुद्दीन खलपे, माजी सरपंच शौकत माखजणकर उपस्थित होते. मुलांना व्यवहारज्ञान अवगत व्हावे तसेच श्रमाचे महत्त्व कळावे, मुलांनी आपल्या घरी व शाळेत एकमेकांना सहकार्य कसे करावे, हा या उत्सवाचा उद्देश होता.

Marathi News Esakal
www.esakal.com