सावंतवाडीत शुक्रवारी संमेलन लोगो स्पर्धा
सावंतवाडीत शुक्रवारी
संमेलन लोगो स्पर्धा
सावंतवाडी ः सावंतवाडी येथे शुक्रवारी (ता. २८) आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त संमेलन लोगो स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे श्रीराम वाचन मंदिरच्या आयोजनाखाली हे संमेलन होत आहे. या स्पर्धेसाठी उत्तम कलाकृतीला २५०० रुपयांचे पारितोषिक तसेच सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. लोगो विषयाला साजेसा वा रंगीत असावा. लोगोचा आकार ५x७ इंच अथवा ६x८ इंच असावा. एक कलाकार एक अथवा दोन लोगो (कलाकृती) पाठवू शकतो. लोगोवर वॉटरमार्क नसावा. लोगो जेपीईजी फॉर्मेटमध्येच व व्हाईट बॅकग्राऊंडवर पाठवावा. रिझोल्यूशन ३०० डीपीआय हवे. कलाकाराने पाठविलेला लोगो ओरिजिनल आणि स्वतः काढलेला असावा. हा लोगो ५ डिसेंबरपर्यंत पाठवावा अथवा प्रत्यक्ष कार्यालयात आणून द्यावा. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेश मोंडकर यांच्याशी अथवा श्रीराम वाचन मंदिर कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन संमेलन आयोजन समितीने केले आहे.
....................
देवगडात ६ डिसेंबरला
तालुका वाचक स्पर्धा
देवगड : येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयात ६ डिसेंबरला दुपारी तीनला तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा विषय ‘मला आवडलेले पुस्तक’ असा आहे. तालुक्यातील वाचकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह सीताराम पाटील यांनी केले आहे. स्पर्धकांना कोणत्याही एका पुस्तकावर विवेचन करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी १० मिनिटे वेळ मर्यादा आहे. लेखकाची थोडक्यात ओळख, पुस्तकाचा आशय, विषयाची मांडणी, कथन शैली आदी मुद्दे विचारात घेतले जातील. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३५१, ३०१ आणि सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना कुडाळ येथील जिल्हा ग्रंथालयात २० डिसेंबरला होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत सहभाग मिळेल. स्पर्धकांनी आपली नावे ४ डिसेंबरपर्यंत उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत द्यावीत. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
...........................
खारेपाटण केंद्रशाळेत
केंद्रस्तरीय महोत्सव
तळेरे : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार केंद्रस्तरीय महोत्सव २०२५ चे आयोजन यंदा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा खारेपाटण क्र.१ येथे केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी दिली. ‘अधिक उंच, अधिक जलद व अधिक बुद्धिमान’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या क्रीडा महोत्सवासाठी खारेपाटण केंद्रशाळेत जोरदार तयारी सुरू आहे. खारेपाटण केंद्रातील एकूण ९ शाळांचा या स्पर्धेमध्ये सहभाग असणार आहे. कबड्डी, खो-खो, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, धावणे, समूहगान, समूहनृत्य व ज्ञानी मी होणार आदी खेळांचा यामध्ये समावेश असणार आहे. स्पर्धेसाठी क्रीडाप्रमख म्हणून संदीप कदम व उपक्रीडाप्रमुख राजेश तेरवनकर यांची नियुक्ती केली आहे.
...........................
शैवाल संवर्धनाबाबत
आज मुणगेत चर्चासत्र
मुणगे ः येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उद्या (ता. २४) समुद्री शैवाल संवर्धन प्रकल्प जनजागृतीसाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मत्स्य व्यवसाय विभाग व कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘समुद्री शैवाल संवर्धन प्रकल्प’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. समुद्री शैवाल संवर्धन या प्रकल्पाद्वारे मच्छीमारी व्यवसायासोबतच अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध होणार असून, किनारी भागातील लाभार्थ्यांना आर्थिक प्रगतीची संधी मिळणार आहे. त्यामुळे मुणगे येथील नौका मालक, मच्छीमार बांधव व मच्छीमार कुटुंबातील तसेच बचतगटातील महिलांनी या चर्चासत्रात सहभाग घ्यावा, असे आवाहन मुणगे ग्रामपंचायतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

