कोकण
सावंतवाडीत गरजूंना धनादेश
06384
सावंतवाडीत गरजूंना धनादेश
सावंतवाडी, ता. २४ ः येथील (कै.) डॉ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना व होतकरू विद्यार्थिनींना (कै.) दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईतर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ह्रदयरोग आणि रक्तदाबाच्या आजाराने पीडित तांबोळी येथील रामचंद्र तांबोळकर, कर्करोगग्रस्त शेर्ले येथील अंकुश धुरी, चराठे येथील प्रमिला जांभळे, सटमटवाडी बांदा येथील अनंत सावंत यांच्यासह पेंडूर येथील होतकरू विद्यार्थिनी सुयेशा चव्हाण, पेंडूर येथील ज्योती मुणगेकर, सावंतवाडी येथील प्रवीण मांजरेकर, पेंडूर येथील विजया गावडे आणि परुळे येथील तृषा वारंग अशा नऊ गरजू व्यक्तींना हे धनादेश प्रदान केले.

