राजापूर तालुका कुष्ठरूग्ण मुक्त

राजापूर तालुका कुष्ठरूग्ण मुक्त

Published on

कुष्ठरोग शोधमोहीम ---------लोगो

राजापूर तालुका कुष्ठरुग्ण मुक्त
आरोग्य विभाग; ४२ हजार ३७६ जणांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः तालुका आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोधमोहीम राबवण्यात येत आहे. त्यात लोकांमध्ये कुष्ठरोगाबाबत जनजागृती करणे आणि तपासणीसाठी तालुक्यात ११५ आरोग्यपथके गठित करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत लोकांशी संवाद साधताना घरोघरी जाऊन सर्वेक्षणही केले जात आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये दीड लाख लोकांपैकी आजपर्यंत ४२ हजार ३७६ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यात एकही कुष्ठरुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
जिल्ह्यातील कुष्ठरोगांची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात शून्य कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याची तालुक्यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी केली जात आहे. कुष्ठरोगासंबंधित जनजागृती आणि लोकांशी संवाद साधण्यासह घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यासाठी तब्बल ११५ पथके गठित करण्यात आली आहेत. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक आदींचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेमध्ये सर्व गावांसह विशेषतः जोखीमग्रस्त व दुर्लक्षित भागांमध्ये राहणाऱ्‍या व्यक्तींमध्ये कुष्ठरोग लक्षणांची ओळख व वेळेवर उपचार देणे, प्रसार रोखणे व सामाजिक भेदभाव दूर करणे, असा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मोहिमेंतर्गत तालुक्यातील दीड लाख लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यापैकी आजपर्यंत ४२ हजार ३७६ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये अद्याप एकही कुष्ठरुग्ण आढळून आलेला नसल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. कुष्ठरोग शोधमोहीम, तपासणी, स्वर्व्हेक्षण सुरू राहणार असून, त्याला लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

चौकट १
कुष्ठरोगाची लक्षणे
* त्वचेवर फिकट किंवा लालसर बधिर चट्टा
* त्वचा जाड, तेलकट किंवा गाठीदार होणे
* कानाच्या पाळ्या जाड होणे
* डोळे पूर्णपणे बंद करता न येणे
* तळहात व तळपायावर मुंग्या येणे
* हाता-पायाची बोटे वाकडी होणे.

चौकट २
राजापूर कुष्ठरोग शोधमोहीम
कुष्ठरोग शोधमोहिमेसाठी पथके* ११५
तपासणी करायची लोकसंख्या* १ लाख ५० हजार
आजर्यंत झालेली तपासणी* ४२ हजार ३७६
सापडलेले कुष्ठरुग्ण* ०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com