इतर आवृत्तीसाठी
रविवार (ता. २३) सांगलीच्या मुख्य अंकातील पान ५ वरून सर्व लोगो घेणे
शेतकऱ्यांना मिळणार शेतीचा नवा मार्ग
सकाळ-ॲग्रोवन ॲग्री एक्स्पो २०२५ ः एआय, सेंद्रिय शेती, निर्यात, दुग्ध व्यवसायातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जागर
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २४ : कृषी ज्ञानाचा बहारदार सोहळा फुलवणारे ‘सकाळ-ॲग्रोवन ॲग्री एक्स्पो २०२५’ प्रदर्शनाचा येत्या शुक्रवारी (ता. २८) विलिंग्डन कॉलेज मैदानावर भव्यदिव्य प्रारंभ होत आहे. यंदाच्या प्रदर्शनाची खासियत म्हणजे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), सेंद्रिय शेती, निर्यात, दुग्ध व्यवसायातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होईल. शेतीचा नवा चेहरा घडवणारे हे एक्स्पो शेतकऱ्यांना समृद्ध करणारे आहे.
‘कन्हैय्या ॲग्रो’प्रस्तुत ‘ॲग्रोवन ॲग्री एक्स्पो-२०२५’ पावर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स, विटा, बी. जी. चितळे डेअरी, भिलवडी व निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रा. लि. तासगाव, तर सहप्रायोजक वर्षा ॲग्रो इंड्रस्टीज, तासगाव, आयडिल ॲग्री सर्च, सांगली, माधुरी सोलर, वारणा दूध संघ, वारणानगर, कारगिल ॲनिमल न्युट्रिशन ॲन्ड हेल्थ, बॅंकिंग पार्टनर स्टेट बॅंक ऑफ इंडिया आहेत.
शेतीची दृष्टी बदलणारे प्रयोगशील तंत्र, अद्ययावत कृषी उपकरणे, जमिनीची उत्पादकता वाढविण्याच्या आधुनिक पद्धती, नैसर्गिक, सेंद्रिय शेतीची मार्गदर्शक तत्त्वे अशा विविध क्षेत्रांचा संगम या प्रदर्शनात होणार आहे. अनुभवी तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी आणि कृषी उद्योगातील कंपन्या एका व्यासपीठावर येऊन शेतीचा नवा मार्ग दाखवतील. त्यामुळे ज्ञान, अनुभव आणि तंत्रज्ञानाचा अस्सल मिलाफ शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे.
यंदाच्या प्रदर्शनाची खासियत म्हणजे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होईल. एआयचा वापर करून पीक व्यवस्थापन कसे करावे, हवामानाचा अचूक अंदाज घेऊन उत्पादन कसे वाढवावे, रोग-कीड नियंत्रणासाठी एआयची मदत कशी होऊ शकते, खर्च कमी करून नफा कसा वाढवता येईल, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळणार आहेत.
कोट
शेतीमधून कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन घ्यायचे असल्यास शुद्ध स्वरूपातील खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये पीक पोषणासाठी वापरणे आवश्यक आहे. शुद्ध व नकली उत्पादनांमध्ये फरक कसा ओळखावा, उत्पादनांची गुणवत्ता कशी तपासावी, खतांमधील शुद्धता कोणत्या पद्धतीने पाहायची, या सर्व माहितीसाठी २८ नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या सकाळ अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रा. लि. स्टॉलवर अवश्य भेट द्या.
- सुभाष पिसाळ, संचालक, निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रा. लि. तासगाव, सांगली
- चंद्रकांत खरमाटे संचालक, निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रायव्हेट लि. तासगाव, सांगली.
‘ॲग्रोवन’ आयोजित कृषी प्रदर्शन शेतकरी बांधवांसाठी पर्वणी आहे. ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून ही ज्ञानाची गंगा आपल्यापर्यंत वाहत येते आहे. या प्रदर्शनामध्ये नेचर केअर फर्टिलायझर्स या आमच्या कंपनीचा स्टॉल असून ‘पारावरच्या गप्पा’ असा विषय घेऊन तज्ज्ञ शेतीविषयक मार्गदर्शन करणार आहेत. द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा अशा फळपिकांसह सर्व प्रकारचा भाजीपाला, ऊस या पिकांच्या व्यवस्थापनासह संपूर्ण मार्गदर्शन कंपनीच्या वतीने केले जाणार आहे.
- जयदेव बर्वे, कार्यकारी संचालक, नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, विटा, जि. सांगली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

