खेड नगर परिषदेचा राजकीय प्रवास १९६७ पासून
-rat२४p१५.jpg-
२५O०६४०९
खेड पालिकेची इमारत
----
फ्लॅशबॅक--------लोगो
ब्रिटीश शासनाने मंजूर
केलेली खेड पालिका
खेड शहरातील नागरिकांसाठी अधिकाधिक नागरी सेवा व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नगरपालिका स्थापन व्हावी, याचा ध्यास घेतलेल्या त्या वेळच्या काही समविचारी नेत्यांनी एकत्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामध्ये जगन्नाथ तथा भाऊसाहेब पाटणे यांच्या पुढाकारातून दामूअण्णा बर्वे, बापूराव बर्वे, गुलाम मोहिद्दिन तांबे, आत्माराम पाटणे, नारायण जोशी, त्र्यंबक चिखले, बी. एस. मेहता यांची मिळालेली साथ व दुसऱ्या महायुद्धात येथील जवानांनी गाजवलेला पराक्रम याचा विचार करून ब्रिटिश शासनाने खेड नगरपालिका मंजूर केली. यामुळे विद्युत पुरवठा, न्यायालय, दूरध्वनी केंद्र, नगर वाचनालय अशा सुविधा खेडच्या पदरात पडल्या अन् राजकीय प्रवासाची सुरुवात झाली...!
----
खेड नगरपालिकेची स्थापना १ एप्रिल १९४० मध्ये झाली. आजपर्यंत १८ नगराध्यक्ष लाभले. (कै.) नारायण बाळाजी जोशी यांना पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान मिळाला होता. वैशाली कवळे या पहिल्या लोकनियुक्त आणि महिला नगराध्यक्ष बनल्या. राज्यात ‘क’ वर्गात उत्कृष्ट नगरपालिकेचा मान खेडने पटकावला आहे. १९६७ ते ७४ या कालावधीत (कै.) शरद चिटणीस यांनी नागरी हितसंवर्धक समिती स्थापन करत निवडणूक जिंकली अन् येथेच खऱ्याखुऱ्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झाला. (कै.) चिटणीस यांनी १९५२ ते ६० या काळात मुख्याधिकारी म्हणून प्रभावीपणे कामही पाहिले होते. त्यानंतर १९७४ ते ८१ च्या दरम्यान अॅड. प्रकाशदादा पाटणे यांच्या सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, मुस्लिम गट आदींनी सहभाग घेत शहराच्या नागरिक विकासाला वाहून घेतले होते. १९७४ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने (कै.) दत्ताजी नलावडे, (कै.) वामनराव महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय मुहूर्तमेढ रोवताना (कै.) सुधाकर बुटाला, सुभाष मेहता, शामकांत तलाठी, सुवासिनी दांडेकर, लक्ष्मण वैद्य, (कै.) गोविंद खेडेकर हे सेना उमेदवार जनता आघाडीमधून निवडून आले होते. १९८६ मध्ये झालेल्या निवडणुकीत सेनेने निर्विवाद बहुमत मिळवत सत्ता काबीज करताना (कै.) किशोर कानडे यांना नगराध्यक्षपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर तत्कालीन आमदार रामदास कदम यांनी १९९१ मध्ये एकेकाळच्या काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. त्यानंतर तब्बल १५ वर्षे राजकीय वर्चस्व त्यांनी अबाधित राखले होते. २००१ मध्ये खेड जनतेतून नगराध्यक्षपदाचा पहिला मान वैशाली कवळे यांना मिळाला होता. २००६च्या निवडणुकीत शिवसेनेच्या समीकरणाला छेद देत बालेकिल्ला पुरता ढासळला होता. मनसे, काँग्रेस आघाडी सेनेच्या गडाला सुरुंग लावला होता. त्यामुळे सेनेला पायउतार व्हावे लागले. या वेळी राष्ट्रवादीच्या शुभांगी टाकळे यांना नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होण्याचा मान मिळाला होता; परंतु या दरम्यान विरोधीपक्ष नेते असलेल्या कदम यांनी पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवत पालिका आपल्या ताब्यात घेतली आणि रहा मुजावर या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या; परंतु २०११ मध्ये मनसेने खेड पालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत गौरी पुळेकर यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली तर शेवटची काही वर्षे पूनम शेट्ये-पाटणे या देखील नगराध्यक्ष राहिल्या. २०१६ च्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट जनतेतून वैभव खेडेकर निवडून आले. या वेळीही खेड पालिकेत नगराध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पालिकेतील नगराध्यक्षपदाची निवडणूक ही तिरंगी असली तरी खरी लढत ही युती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळणार आहे.
चौकट
आजपर्यंत लाभले १८ नगराध्यक्ष
१९४० ला शहराची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास होती. आजमितीस १७ हजार ८०० इतकी आहे. सुरुवातीला ६ प्रभागातील प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक याप्रमाणे १२ नगरसेवक कार्यरत होते. त्यानंतर प्रभागाची संख्या १५ झाली. १९४० मध्ये कै. नारायण बाळाजी जोशी यांना नगराध्यक्षपदाचा पहिला मान मिळाला होता. त्यानंतर ८४ वर्षाच्या कारकिर्दीत आजपर्यंत पालिकेला १८ नगराध्यक्ष लाभले. यामध्ये सरलाबाई जगन्नाथ पाटणे यांना १५ वर्षाच्या काळात सर्वाधिक १० वर्ष नगराध्यक्षपदाचा कालावधी मिळाला होता.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

