सरकारनामासाठी
-rat२४p१.jpg-
२५O०६३५५
रत्नागिरी ः रत्नागिरीत ‘नगराध्यक्ष उमेदवार, थेट प्रश्न, थेट उत्तर’ या विशेष कार्यक्रमात उपस्थित नगराध्यक्षपदाच्या उमेदवार.
-----
रत्नागिरीत ‘महिला नेतृत्व’चा विकासमार्ग स्पष्ट
‘थेट प्रश्न, थेट उत्तर’ कार्यक्रम; पायाभूत सुविधांसह रोजगार निर्मितीला चालना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः रत्नागिरीतील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्त महिला उमेदवारांनी राजकीय व्हिजन आणि राजकीय सामर्थ्याची चुणूक दाखवली. प्रत्येक उमेदवाराने आपली बाजू खंबीरपणे मांडतानाच विविध प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली. नगराध्यक्षपदासाठीचे व्हिजन काय आहे, ते सर्वांपुढे मांडले. सर्वच उमेदवारांनी पायाभूत सुविधांसह रोजगार निर्मितीवर भर देण्याचा संकल्प केला आहे.
रत्नागिरीत शनिवारी (ता. २२) सायंकाळी आयोजित केलेल्या ‘नगराध्यक्ष उमेदवार : थेट प्रश्न, थेट उत्तर’ या विशेष कार्यक्रमात नगराध्यक्षपदाचे महायुतीचे उमेदवार शिल्पा सुर्वे, महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी माने, अपक्ष संध्या कोसुंबकर, आप पक्षाच्या उमेदवार सुश्मिता शिंदे आणि अपक्ष वहिदा मुर्तुजा या महिला उमेदवार सहभाग झाल्या होत्या. नगरपालिकेची आर्थिक नाजूक स्थिती आणि विकासनिधी यावर सुर्वे यांनी मत मांडले. पालिकेची ४२ कोटींची आर्थिक तूट वर्षभरात भरून काढू, अशी ग्वाही दिली. पाणीटंचाई आणि वाहतूककोंडीवर उपाय यांसह सर्वांगसुंदर शहर बनवण्याचा ध्यासही त्यांनी व्यक्त केला. शहरात मल्टीलेव्हल पार्किंगची सोय उपलब्ध करण्याची भूमिका त्यांनी मांडली. शिवानी माने यांनी महिला-युवक सक्षमीकरण आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर जोर दिला. निधीच्या बळावर मूलभूत सुविधा आणि आर्थिक सुसूत्रता आणणे तसेच ‘स्कीम टू टूल’ योजनेतून युवकांसाठी कौशल्ये आणि रोजगाराचे अनुदान तर महिलांसाठी मीनाताई ठाकरे योजनेच्या सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीतील ई-पार्किंग सुविधा तातडीने कार्यान्वित करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले.
संध्या कोसुंबकर यांनी नगरपालिकेतील कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत सहज आणि पारदर्शकपणे पोहोचवण्याची भूमिका मांडली. शांत रत्नागिरीकरांना सुविधांसाठी झगडावे लागू नये यासाठी थेट संवाद साधण्यावर भर देणार असल्याचे सांगितले तसेच, रस्ते, पार्किंग, रस्त्यावरील मोकाट गाईंसाठी निवारा आणि बचतगट सक्षमीकरण, पर्यटन विकासातून स्थानिक रोजगार निर्मिती याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपच्या उमेदवार शिंदे यांनी रस्ते, वाहतूक, पर्यावरण, स्वच्छता यावर जास्त लक्ष देण्याचा मानस व्यक्त केला. आपला २० कलमी कार्यक्रम जनतेसमोर पोहचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या उमेदवार वहिदा मुर्तुजा यांनी शहरातील सुस्थितीत रस्ते, आठवडा बाजार प्रसाधनगृह, विक्रेत्यांना रोजगार व्यवस्था, नागरिकांना प्रशासनाकडे तत्काळ सेवा मिळावी म्हणून जलद कारभार, सर्वांगीण विकासात्मक रत्नागिरीचे ध्येय समोर ठेवले. प्रशासकीय किचकटपणा दूर करून लोकाभिमुख कारभार करू, असे स्पष्ट केले.
---
चौकट
मानेंचा मोठेपणा आणि सुर्वेंचा आशीर्वाद
गप्पांच्या ओघात एक अत्यंत मन जिंकणारा सुसंस्कृतपणाचा प्रसंग घडला. उबाठाच्या तरुण उमेदवार शिवानी माने यांनी कुठलेही राजकीय हेवेदावे न ठेवता, शिल्पा सुर्वे यांना ज्येष्ठत्वाचा मान देत विनम्रपणे नमस्कार केला. सौ. सुर्वे यांनीही आपुलकीने त्यांना आशीर्वाद दिला. निवडणुकीच्या रिंगणातील प्रतिस्पर्धी असूनही, एकमेकींविषयी असलेला आदर आणि निकोप भावनेचे दर्शन घडवणाऱ्या या प्रसंगांची सर्वत्र चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

