भास्कर जाधव मशाल चिन्हाचा प्रचार करतील
-rat२४p१९.JPG-
P२५O०६४२९
चिपळूण : गोवळकोट रोड येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विनायक राऊत.
-------
भास्कर जाधव ‘मशाल’चा प्रचार करतील
विनायक राऊत ः शिवसेनेत दोन गट नाही, गैरसमज दूर करू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : आमदार भास्कर जाधव शिवसेनेचे नेते आहेत. ते चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत मशाल या चिन्हाचा प्रचार करतील. शिवसेनेत कुठेही दोन गट नाहीत. काही चुका झाल्या असतील किंवा समन्वय झाला नसेल तर आमचे कार्यकर्ते त्यांना भेटून त्यांचे गैरसमज दूर करतील, अशी माहिती शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
राऊत यांनी आज इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल, गोवळकोट रोड येथे भेट देऊन चिपळूण नगरपरिषद निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या वेळी पत्रकारांनी त्यांना गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणार आहेत. याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, मी या भागाचा माजी खासदार आहे. पक्षाचा नेता आहे त्यामुळे मी काही सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. जाधव हे लवकरच सक्रिय होतील आणि मशालचा प्रचार करतील, असे राऊत यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पालिका निवडणुकीत जोरदार कामगिरी करण्याचे आवाहन केले. या भेटीदरम्यान उमेदवारांशी तसेच शहर पदाधिकाऱ्यांशी निवडणूक रणनीती, बूथस्तरावरील संघटन, मतदारांशी संवाद आणि शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. पक्ष संघटनेने एकजुटीने काम करून जनतेशी संपर्क वाढवावा, असा संदेश राऊत यांनी दिला. या वेळी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही उमेदवारांना निवडणूक जनसंपर्क मोहीम आणि संघटन बळकटीकरणाबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हा संपर्कप्रमुख नेहा माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन उर्फ भैया कदम उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

