वन विभाग केव्हा होणार सक्षम 0

वन विभाग केव्हा होणार सक्षम 0

Published on

ग्राऊंड रिपोर्ट-------लोगो


- rat२५p२२.jpg-
२५O०६५९३
राजापूर ः ब्लॅक पॅंथर
- rat२५p२३.jpg-
२५O०६५९४
राजापूर तालुका नकाशा
- rat२५p२४.jpg-
P२५O०६५९५
वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करताना माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत. त्यांच्यासमवेत स्वीय सहाय्यक आदिनाथ कपाळे.
----
राजापुरात चार वर्षात १३ बिबट्यांचा मृत्यू
मानवीवस्तीत वाढता वावर ; ११ सुरक्षित, वनविभागाकडे अपुरे मनुष्यबळ
राजेंद्र बाईत ः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः राजापूर तालुक्यात गेल्या चार वर्षांमध्ये विहिरीत बिबट्या पडणे वा फासकीत अडकण्याचे ११ प्रकार घडले असून, त्यांची वनविभागाने सुखरूप सुटका केली; मात्र मागील चार वर्षांमध्ये विविध ठिकाणी १३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे, ही चिंतेची बाब आहे. मानवीवस्तीकडील बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन वनविभागाला सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठीचे प्रस्ताव शासन मंजूर करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजापूर तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर अधिक आहे. राजापूरचे वनक्षेत्र २९९.८५ हेक्टर इतके आहे. सुमारे पंधरा वर्षापूर्वी ओणी येथे विहिरीत ब्लॅक पँथर पडला होता. त्यानंतर गतवर्षी कुवेशीत फासकीत ब्लॅक पॅंथर अडकल्याची नोंद झाली. दोन्ही ठिकाणी वनविभागाने ब्लॅक पँथरची सुखरूपपणे सुटका केली. दुसऱ्‍या बाजूला राजापूरपासून काही अंतरावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पट्टेरी वाघाचे वास्तव्य आहे. वन्यजीव संस्थानने (डब्ल्यूआयआय) कर्नाटक, गोवा आणि सिंधुदुर्ग असा वाघाचा कॉरिडॉर असल्याचे सर्व्हेक्षणातून स्पष्ट केले आहे. राजापूर तालुक्यात गेल्या चार वर्षांमध्ये विहिरीत बिबट्या पडणे वा फासकीत अडकण्याचे ११ प्रकार घडले होते तर १३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे, ही चिंतेची बाब आहे.
मानवीवस्तीत बिबट्यासह वन्यजीवांचा वावर वाढला आहे. यासाठी वनविभागाला सक्षम करणे गरजेचे आहे. यंत्रसामग्री आणि कर्मचारीवर्ग अपुरा पडत असल्यामुळे पश्‍चिमेच्या समुद्रकिनाऱ्‍यापासून थेट सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेल्या राजापूर परिमंडळात पंचायत समिती गणनिहाय एक याप्रमाणे १२ वनमजुरांच्या प्रस्तावाला अनुदानासह प्रशासकीय मंजुरी मिळावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांनी शासनाकडे केली आहे. वन्यजीव अन् वनसंपदेच्या जतन अन् संवर्धनाच्या वनविभागाच्या प्रयत्नांना बळ मिळण्यासाठी वनमजुरांच्या मंजुरीच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. यासाठी आदिनाथ कपाळे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. याची दखल घेऊन वनमंत्री नाईक यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना वनखात्याच्या अप्पर मुख्य सचिवांना दिल्या आहेत. त्यामुळे वनविभागाला बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
---
चौकट १
लोकवस्तीत वावर वाढला
बिबट्या-वन्यप्राणी यांच्यातील संघर्षातून माणसांवरील हल्ले वाढत आहेत. दोन वर्षापूर्वी राजापूर शहरासह सौंदळ येथे वाहनचालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. काही महिन्यांपूर्वी पेंडखळे-भू परिसरात रात्रीच्यावेळी वाहनचालकाचा बिबट्याने पाठलाग केला होता. काही दिवसांपूर्वी घराच्या प्रांगणात पाळीव कुत्र्यांची बिबट्याकडून शिकार झाली होती. शेतकऱ्‍यांच्या गोठ्यामध्ये घुसून अनेक जनावरांना बिबट्याने मारले आहे. त्यातून, शेतकऱ्‍यांना गोधनाच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बिबट्याच्या वाढत्या वावराने लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

चौकट २
अपुरा कर्मचारीवर्ग
राजापूर वनपरिमंडळात २४८ गावे असून, सुमारे दीड लाख लोकवस्ती आहे. त्यात बिबट्याचा वावर वाढला असून, अनेकवेळा बिबट्याने माणसांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासोबत वन्यप्राण्यांच्या रेस्क्यूच्याही घटना घडत असतात. त्या रोखण्यासाठी वा तशा घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्यासाठी वनविभागाकडे पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. सद्यःस्थितीत राजापूर परिमंडळामध्ये एक वनपाल व एक वनरक्षक एवढाच कर्मचारी कार्यरत आहे. अपुऱ्‍या कर्मचारीवर्गामुळे वनविभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चौकट ३
पुरेशा साधनसामग्रीचा अभाव
पश्‍चिम घाटातील जैवविविधतेचा वारसा लाभलेल्या राजापूर तालुक्यामध्ये विविध दुर्मिळ वन्यजीवांचे वास्तव्य आहे; मात्र वनविभागाकडे पुरेशा सुविधा नाहीत. कर्मचारी अपुरे असून, शिकारींवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हानही आहे. रात्रीची गस्त घालण्यासाठी दर्जेदार बॅटऱ्‍या उपलब्ध असल्या तरीही गस्तीसाठी आवश्यक गाडी नाही. संरक्षण वनमजुरांसह अन्य कर्मचाऱ्‍यांची कमतरता आहे. पेट्रोलिंग पथक नाही. एखाद्या शिकाऱ्याने हल्ला केल्यास स्वरक्षणासाठी कर्मचाऱ्‍यांकडे अत्यावश्यक सुविधाही नाहीत. या परिस्थितीत जंगलाचा आणि वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षणाचे काम वनविभाग करत आहे.

चौकट ४
वनमजुरांचे काम
वनांचे संरक्षण आणि संवर्धन, वृक्षलागवड करणे आणि त्याची देखभाल करणे, जंगलातील आग प्रतिबंध व नियंत्रण करणे, वनविभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे, जलसंधारणाची कामे करणे आदी विविध स्वरूपाची कामे वनमजुरांतर्फे केली जातात. शिकार रोखण्यासह मानवी वस्तीमध्ये शिरलले वन्यप्राणी वाचवण्यासाठी वन्य कर्मचाऱ्‍यांना सहाय्य म्हणूनही ते महत्त्वाची भूमिका बजावतात. हे वनमजूर वनरक्षकाच्या देखरेखीखाली काम करतात.
-----
कोट १
वन्यजीव हे मानवाचे दुश्मन नाहीत; मात्र, बेसुमार वृक्षतोड आणि भक्षाची कमतरता यामुळे बिबट्याचा मानवीवस्तीकडे वावर वाढला आहे. मानवाला सुसह्यपणे जगण्यासाठी आणि निसर्गातील अन्नसाखळी कायम राहण्यासाठी वनासह वन्यजीव याचं संवर्धन करणे काळाची गरज आहे. वनविभागातील कर्मचाऱ्‍यांची संख्या वाढवून वन्यजीवाबाबत समाज प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे.

- धनंजय मराठे, वन्यजीव अभ्यासक

Marathi News Esakal
www.esakal.com