मंडणगड-लोकसहभागातून एका दिवसात उभारले १५ बंधारे
rat२६p४.jpg-
०६७२१
गोठेः एका दिवसात १५ बंधाऱ्यांची निर्मिती करून गोठे ग्रामपंचायतीने आदर्श घालून दिला.
लोकसहभागातून एका दिवसात उभारले १५ बंधारे
गोठे ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात उपक्रम; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २६ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गोठे ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गोठे, खलाटी, सिद्धार्थ नगर, बोरखत, धामणी व कळकवणे या गावांमध्ये काल (ता. २५) जलस्रोत संवर्धनासाठी भव्य श्रमदान उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांनी कच्चे, वनराई व विजय बंधारे उभारून तसेच नदीतील गाळ काढून जलसाठा वाढवण्याचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला. त्यामध्ये एका दिवसात तब्बल १५ बंधारे तर आजवर एकूण २० बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण केले.
पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेंतर्गत जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्र लोकसहभागातून बंधारे उभारण्यासाठी आवाहन केले होते. त्याला गोठे ग्रुपग्रामपंचायतीने चांगला प्रतिसाद दिला आहे. ग्रामस्थ व महिलांनी एकत्र येऊन श्रमदानातून बंधारे बांधण्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक करत गटविकास अधिकारी सुनील खरात यांनी जलस्रोत बळकटीकरणासाठी उचललेले ग्रामस्थांचे पाऊस आदर्शवत आहे, असे सांगितले तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पुढील कामकाजासाठी मार्गदर्शनही केले.
या वेळी विस्तार अधिकारी पवन गोसावी, समीर वारे, माजी सभापती दौलतराव पोस्टुरे, सरपंच अंजली घागरूम, उपसरपंच संजय बोतरे, सदस्य उमेश घागरूम, विनोद जाधव, प्रवीना भुवड, रिया बंगाल, ग्रामपंचायत अधिकारी दीपक टेमकर, आशासेविका सृष्टी जाखल आदी उपस्थित होते.
चौकट
जिल्ह्यातील ८ हजार ६६५ बंधाऱ्यांचे लक्ष्य
जिल्ह्यातील ७९३ ग्रामपंचायतींमध्ये यंदा ८ हजार ६६५ बंधारे बांधण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यातील ४३ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. येत्या महिन्याभरात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बंधारे बांधून होतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

