रत्नागिरीः बांगलादेशी घुसखोरांविरोधी कोंबिंग ऑपरेशन
rat26p5.jpg
06722
रत्नागिरीः हिंदू राष्ट्र समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकाऱी मनुज जिंदल यांना निवेदन देताना समितीचे पदाधिकारी.
-----------
बांगलादेशी घुसखोरांविरोधी कोम्बिंग ऑपरेशन
जिल्हाधिकारी जिंदल; हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे रत्नागिरीत निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्र समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्या संबंधी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कोम्बिंग ऑपरेशनचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्याची ग्वाही दिली आहे तसेच कोकण रेल्वेमधून येणाऱ्या संशयास्पद आणि अनोळखी व्यक्तींबाबत रेल्वेपोलिसांना तपास करायला सांगू. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने सांगण्यात आले.
समितीतर्फे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना या संदर्भात दोन महत्त्वाची निवेदने देण्यात आली. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. विशेष म्हणजे यापैकी काहीजण कोणत्याही कागदपत्रांशिवाय तर काहीजण बनावट कागदपत्रांसह अनेक वर्षे जिल्ह्यात राहत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. रेल्वेमधून अनोळखी व्यक्ती रत्नागिरीत प्रवेश करतात. येथील औद्योगिक क्षेत्र परिसरातील रिकामे प्लॉट, रिकाम्या इमारती, बेघरांसाठी आरक्षित असलेले भूखंड इत्यादी ठिकाणी वास्तव्य करत असल्याची दाट शक्यता आहे.
दिल्लीतील ब़ॉम्बस्फोटात उच्चशिक्षित धर्मांध डॉक्टरांचा सहभाग आढळून आला आहे. दहशतवाद्यांचा अयोध्येतील श्रीराम मंदिर, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर येथे ६ डिसेंबरला मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट होता. बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि जन्मदाखले मिळवून रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोर भारतीय नागरिक म्हणून वावरत आहेत. कुवारबाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश तोडणकर, कार्याध्यक्ष हितेंद्र पटेल, सचिव प्रभाकर खानविलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विजय सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते संदीप सुर्वे, दीपक गावडे, शैलेश बेर्डे, संकेत कदम, अमितराज खटावकर, आदेश धुमक, उत्कर्ष कळंबटे, मांगीलाल माळी, मुकेश माळी, हिंदू जनजागृती समितीचे विष्णू बगाडे, गोविंद भारद्वाज, संजय जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
चौकट १
बांगलादेशींचे व्यवसाय
फळ रसविक्री, भंगार व्यवसाय, बेकरी व्यवसाय, बांधकाम क्षेत्र, मासेमारी क्षेत्र, झोपडपट्ट्या यांमध्ये बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे. अशा सर्वांची ओळख परेड तपासणी पोलिस आणि प्रशासनाने तातडीने करावी. जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम राबवावी, बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी, घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करून त्यांना देशाबाहेर हाकलून द्यावे, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने केली.
चौकट २
हिंदू राष्ट्र समितीच्या मागण्या
देशभरात विशेषतः संवेदनशील परिसरात व्यापक शोधमोहीम घेऊन दोषी, बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. दहशतवादी कारवायांशी संबंध असणाऱ्या शिक्षणसंस्थांची मान्यता रद्द करावी, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

