रत्नागिरी ः उद्योजक महिलांना नवीन व्यावसायिक संधी

रत्नागिरी ः उद्योजक महिलांना नवीन व्यावसायिक संधी

Published on

rat26p19.jpg
06769
रत्नागिरी : ग्रामउन्नती संस्थेच्या मार्गदर्शन कार्यक्रमावेळी महिला उद्योगिनींच्या स्टॉलवर माहिती घेण्यासाठी झालेली गर्दी.
rat26p20.jpg
06770
रत्नागिरी : विविध खेळांच्या माध्यमातून महिला उद्योगिनींना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले.

उद्योजक महिलांना नवीन व्यावसायिक संधी
ग्रामउन्नती डॉट नेट; तीन तालुक्यांतील २५० उद्योगिनींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : महिला उद्योगिनींना सुयोग्य मार्गदर्शन, व्यावसायिक संधी यांची माहिती एकाच व्यासपिठावर मिळण्यासाठी पुण्यातील ग्रामउन्नती संस्थेने उमेद अभियानाच्या तीन तालुक्यांतील उद्योजक महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला. त्याला महिला उद्योगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवनवीन व्यावसायिक संधींची माहितीसुद्धा मिळाली तसेच ९ महिलांचा सन्मान करण्यात आला.
स्वयंवर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. व्यावसायिक कौशल्यांवर आधारित असलेल्या खेळांचा महिलांनी आनंद घेतला. व्यवसायातील उलाढाल, नफा-तोटा व आर्थिक गणित कसे करायचे यासाठी ग्रामउन्नती डॉट नेट या संस्थेने गणिताच्या टूलद्वारे महिलांसाठी मार्गदर्शनपर करण्यात आले. त्याचा उपयोग करून व्यवसायाचे आर्थिक विश्लेषण प्रत्येक उद्योजिकेला करता येईल, असे या वेळी सांगण्यात आले.
प्रशिक्षक शब्बीर गवंडी आणि दिवाकर सायंकार यांनी मार्गदर्शन सत्र घेतले. योजनेतून मराठा चेंबरमार्फत महिला उद्योजकांना सरकारी प्रमाणपत्र देण्यात आले. रत्नागिरीत उपलब्ध असणारी फळे, भाजी वाळवून त्याचा व्यवसाय करणाच्यादृष्टीने सोलर कंपनीचे महाव्यवस्थापक परमित यांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरीमधील तरुण व्यावसायिक अनबॉक्सचे संचालक गौरांग आगाशे यांच्या अनिकेत कोनकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून उपस्थितांना प्रेरणा, मार्गदर्शन आणि संधी मिळाली.
बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी संस्थेद्वारे महिलांसाठी घेतल्या जाणाऱ्या उद्योजकीय कौशल्याधारित कोर्सेसची माहिती दिली. महेश गर्दे यांनी ‘अमृत’ योजना व उद्योगांसाठी सरकारी योजना या संबंधी सांगितले. कार्यक्रमात तीन तालुक्यातील अडिचशे उद्योजक महिला सहभागी झाल्या. यातील नऊ महिला उद्योजिकांच्या यशोगाथांचा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना ग्रामउन्नती डॉट नेटचे अमित अस्नीकर यांची होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.

चौकट
यांचा झाला सन्मान
स्वाती शेलार (इमिटेशन ज्वेलरी, कर्ला), विद्याराणी झापडेकर (हंगामी फळे आणि प्रक्रिया व्यवसाय, चांदेराई), मानसी चव्हाण (हॉटेल व्यवसाय, डोंगर, ता. राजापूर), स्वरा आंब्रे (टेलरिंग व्यवसाय, देवळे ता. संगमेश्वर), तृप्ती कदम (टेलरिंग, आंबाप्रक्रिया, गावखडी), मानसी पवार (भाजीविक्री, कारवांचीवाडी), पूर्वा काळोखे (केक उद्योग, देवळे), सोनाली शिवलकर (गांडूख खतनिर्मिती, बसणी), साक्षी नाटेकर (शुद्ध खोबरेल तेल निर्मिती, कशेळी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com